Close

नियंत्रण ठेवणारा पती, आलियाच्या त्या व्हिडिओमुळे नेटकरी अभिनेत्यावर भडकले (Ranbir Gets Brutally Trolled After Alia Reveals He Said ‘Wipe Off’ Lipstick)

सोशल मीडियावर सध्या रणबीर कपूरवर जोरदार टीका होत आहे. नेटिझन्स त्याला चांगलेच ट्रोल करत आहेत. काहीजण त्याला विषारी म्हणत आहेत तर काही त्याला आपल्या पत्नीवर नियंत्रण ठेवणारा असे म्हणत आहेत. तो आलियाला तिला पाहिजे ते का करू देत नाही? असा प्रश्न अनेक नेकरी करत आहेत.

आलिया भट्टने नुकताच एक YouTube व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांना ती लिपस्टिक कशी लावते हे सांगत आहे. या व्हिडिओमध्ये ती आधी ओठांवर लिपस्टिक लावते आणि नंतर लिपस्टिक काढते.

दरम्यान, आलिया भट्टने तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक गोष्ट उघड केली आहे की तिचा पती रणबीर कपूरला तिची लिपस्टिक आवडत नाही.

यासोबतच आलिया हे देखील सांगितले की, लग्नापूर्वी जेव्हा रणबीर आणि आलिया रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळीही रणबीर कपूरला तिचे नैसर्गिक ओठ आवडायचे. जेव्हा तो आलियाला लिपस्टिकमध्ये पाहायचा तेव्हा तो नेहमी लिपस्टिक पुसायला सांगायचा.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स आलिया भट्टचा पती रणबीर कपूरला चांगलेच ट्रोल करत आहेत. कमेंट बॉक्समध्ये एकाने लिहिले की - तो नेहमी नियंत्रण का ठेवतो. तिला तिच्या आवडीची लिपस्टिक लावू द्या.

दुसर्‍या नेटिझनने लिहिले - माझा पती, माझा पती नेहमी सारख एवढीच करत असते. रणबीरवरचा राग काढत आलियाच्या आणखी एका चाहत्याने लिहिले - कंट्रोलिंग हजबंड रणबीर  

Share this article