सध्या बॉक्स ऑफिसवर संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी जगभरात ११६ कोटी रुपयांची कमाई करुन सिनेमाने इतिहास रचला. रिलीज पूर्वी या सिनेमातील काही सीन डिलीट करण्यात आलेले. त्यातीलच एक सीन आता व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर जखमी असून नशेत आहेत. तसेच पायलटच्या हातून कमांड घेऊन तो स्वतः विमान उडवत आहे.
या सीनमध्ये रणबीर कपूरच्या डोळ्यांना दुखापत झाली आहे. त्यात तो त्याच्या भावांसोबत विमानात दिसत आहे. तिथे तो हातातील ग्लासात दारु ओतून पितो. मग रणबीर जाऊन पायलटला उठवून स्वतः विमान उडवायला सुरुवात करतो. यादरम्यान 'पापा मेरी जान' हे गाणे बॅकग्राऊंडमध्ये वाजताना दिसते.
https://x.com/itsmePranshu/status/1730993258304786812?s=20
'अॅनिमल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या सिनेमात बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि रणबीर कपूर यांच्याशिवाय इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाला खूप प्रशंसा मिळाली.
आता हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्म Netflix वर कधी प्रदर्शित होईल, तेव्हाच त्याची खरी कहाणी कळेल. कारण हा ३.२३ तासांचा चित्रपट या प्लॅटफॉर्मवर ४ तासांचा असेल. त्यात हे डिलीट केलेले सीन दाखवले जातील.