Close

राहाने आलियासारखं व्हायला नको! असं का म्हणालेला रणबीर कपूर  (Ranbir Kapoor Does Not Want Daughter Raha To Have A Personality Like Alia Bhatt)

अलीकडेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांची मुलगी राहा कपूरचा चेहरा चाहत्यांना दाखवला. राहाचे फोटो व्हायरल झाल्यापासून तिच्या निरागसतेवर सर्वचजण फिदा झाले आहेत. राहाचे निळे डोळे पाहून सर्वजण तिची राज कपूरशी तुलना करू लागले. तर कोणी तिच्या चेहऱ्याची तुलना आजोबा ऋषी कपूर यांच्याशी केली. दरम्यान, रणबीर कपूरचा एक जुना व्हिडीओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले होते की, त्याची मुलगी आलिया भट्टसारखी बनू नये असं त्याला वाटतंय

रणबीरने असे केव्हा आणि का म्हटले होते, ज्यामुळे लोक आता त्याला ट्रोल करत आहेत. तू झुटी मैं मकर या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणबीरने हे सांगितले होते. रणबीर म्हणाला- मी आलियाला सांगितले की राहा तुझ्यासारखी दिसते. जर ती तुझ्यासारखी दिसत असेल तर ती एक चांगली दिसणारी व्यक्ती असली पाहिजे, परंतु मला माझ्यामते तिचे व्यक्तिमत्व माझ्यासारखे असेल, तुझ्यासारखे नाही.

त्यावेळीही रणबीरला या प्रकरणावरून खूप ट्रोल करण्यात आले होते, त्यानंतर त्याला स्पष्टीकरण द्यावे लागले होते. रणबीर म्हणाला की तो एकाच घरात दोन आलिया सहन करू शकत नाही. आलिया खूप लाऊड आहे आणि ती खूप बोलते. घरात फक्त एकच आलिया पुरेशी आहे, नाहीतर अशा दोन मुलींना एकट्याने सांभाळणं हे आव्हानापेक्षा कमी नसतं, म्हणूनच राहा मोठी होऊन त्यांच्यासारखं शांत होईल, जेणेकरून दोघी मिळून आलियाची काळजी घेऊ शकतील अशी त्यांना आशा आहे. .

लोक रणबीरला ट्रोल करत आहेत की तो आपल्या पत्नीचा आदर करत नाही आणि अशा गोष्टी जाहीरपणे बोलतो.

Share this article