स्टारकिड राहा कपूरने अगदी कमी वयातच नेटकऱ्यांच्या मनाचा ठाव घेतला. राहा कपूरच्या क्यूट स्माईलचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहा तिचे वडील रणबीर कपूरवर प्रेमाचा वर्षाव केल्यानंतर हसताना दिसत आहे.

बॉलीवूडचे पॉवर कपल आलिया भट्ट आणि रणवीर कपूर राहासोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या युरोपमधील दुसऱ्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला उपस्थित राहून मुंबईला परतले आहेत.

बेबी कपूर रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत कलिना विमानतळावर दिसली. यादरम्यान पापाराझींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर राहा आपल्या कडेवर घेऊन कलिना विमानतळावरून निघताना दिसत आहे.

आलिया भट्टही त्याच्या मागे होती. पण बेबी राहा कपूरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. जी तिच्या वडिलांना किस करताना दिसली. यानंतर राहा गोड हसत होती.

कारमध्ये येण्यापूर्वी रणबीरने हस्तांदोलन करून पॅप्सचे स्वागत केले. विमानतळावरुन बाहेर येताना आलियाने हसत हसत फोटोग्राफरला पोज दिली.

राहाच्या क्यूट स्माईलच्या व्हिडिओवर चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की ओएमजी राहा किती क्यूट आहे, जी तिच्या वडिलांच्या गालावर किस करत आहे. पप्पाला किस केल्यावर राहा चे स्मित पहा, किती गोड आहे.