रणबीर कपूर हा चित्रपट निर्माते नितेश तिवारीच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. या चित्रपटात रणबीर प्रभू श्री रामाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी या चित्रपटात रणबीर कपूर रामची भूमिका साकारणार हे निश्चित आहे. आता या चित्रपटाबाबत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. वृत्तानुसार, रणबीर कपूरने चित्रपटासाठी मद्यपान आणि मांसाहार सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
रणबीर कपूर हा अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, जे कलाकार त्यांचे पात्र उत्तमरित्या साकारण्यासाठी खूप मेहनत घेतात. रणबीर आता नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये श्रीरामाची भूमिका साकारणार असल्याने ही भूमिका परिपूर्ण करण्यासाठी त्याने आपली जीवनशैली आणि आहार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूरने मर्यादा पुरुषोत्तम रामासारखे पवित्र होण्यासाठी मद्य आणि मांसाहार सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रणबीर हे त्याच्या सार्वजनिक प्रतिमेसाठी नाही तर रामाच्या पात्राला न्याय देण्यासाठी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे शूटिंग सुरू होईपर्यंत रणबीरने स्वतःला मद्य आणि मांसाहारापासून पूर्णपणे दूर ठेवले आहे. इतकेच नाही तर रणबीर रात्री उशिरा पार्ट्याही करत नाही. याआधी आलिया भट्ट रणबीरसोबत या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार, अशा बातम्या आल्या होत्या, पण ही बातमी चुकीची ठरली. आता साऊथ अभिनेत्री सई पल्लवी सीतेच्या मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर KZIF अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लक्ष्मणच्या भूमिकेसाठी सध्या अनेक अभिनेत्यांच्या नावाची चर्चा आहे.
चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होणार असून ऑगस्ट २०२४ पर्यंत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होईल.