रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा बहूप्रतिक्षित चित्रपट लवकरच रिलीज होत आहे. काल या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये रणबीरचा भयानक लूक पाहिल्यानंतर सर्वांचाच थरकाप उडत आहे. रणबीर कपूरने 'एनिमल'ची फी कमी केल्याची बातमी समोर येत आहे. जाणून घेऊया काय आहे सत्य?
पिंकविलामध्ये दिलेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरने एकूण उत्पादन गुणवत्तेत सुधार करण्यासाठी निर्मात्यांना पाठिंबा म्हणून आपले फी कमी करण्याचा निर्णय घेतला. रणबीरने या चित्रपटाची फी ७० कोटींवरून ३५ कोटींवर आणल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या बदलामुळे निर्माते भूषण कुमार यांना चित्रपटाच्या निर्मिती बजेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अतिरिक्त रक्कम उभारण्यात मदत झाली.
या चित्रपटासाठी रणबीर कपूरने चित्रपटाच्या नफ्यात वाटा उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी रणबीर कपूरने पहिल्यांदाच नफा शेअरिंग मॉडेल फॉलो केले आहे. याआधी तीन खानांसह इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी असे केले होते.
'एनिमल' चे दिग्दर्शन कबीर फेम संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा बहुप्रतिक्षित चित्रपट १ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.