Close

आलिया नणंदेला ‘गॉसिप क्वीन’ का म्हणाली? तिचं बोलणं ऐकून सगळेच हैराण….(Ranbir Kapoors Sister Riddhima Kapoor Is The Gossip Queen Alia Bhatt Opened Secrets Of Sister In Laws)

आलिया रणबीर कपूरची बहिण रिद्धीमा कपूर साहनीने नुकतेच रिॲलिटी सीरिज फॅब्युलस लाइव्स वर्सेस बॉलिवूड वाइव्स सीझन ३ मधून पदार्पण केले आहे. या शोच्या प्रमोशन दरम्यान आलिया भटने नणंद रिद्धीमावर प्रेमाचा वर्षाव केला आणि गॉसिप करण्यात ती रणबीरच्या पुढे असल्याचेही म्हटले. आलियाने रिद्धीमाला राहाची सर्वात एण्टरटेनिंग आत्या असल्याचेही म्हटलं आहे.

रिद्धिमा कपूर साहनीविषयी बोलायचं झालं तर ती एक ज्वेलरी डिझायनर आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या Fabulous Lives of Bollywood Wives च्या तिसऱ्या सीझनमध्ये ती दिसत आहे. या सीरिजमधून रिद्धिमा ही स्क्रीनवर पदार्पण करणार आहे. या सगळ्यात आलिया भट्टचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आलियाचा हा व्हिडीओ 'गलाट्टा इंडिया'नं शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये आलियानं रिद्धिमाला कुटुंबातील सगळ्यात मोठी गॉसिप क्वीन म्हटलं आहे. ती रिद्धिमाला चिडवत म्हणाली की, तिला इंडस्ट्रीमधील छोट्यापासून मोठ्या गॉसिपपर्यंत सगळं माहीत असतं. जगात जर कोणी आहे जिच्याकडे खूप बातम्या आहेत, तर ती रिद्धीमा आहे. मुळात ती जे काही सांगते ते नंतर खरं असल्याचं कळतं. आलिया म्हणाली, ती अगदी सहजपणे मोठ्या मोठ्या गॉसिप सांगते. तिला रणबीरपेक्षाही जास्त माहिती असते.

आलियानं पुढे रिद्धिमाची स्तुती केली आणि सांगितलं की ती खूपच प्रेमळ आणि दयाळू व्यक्ती आहे. ती राहाची आवडती आत्या आहे. आलियानं सांगितलं की रिद्धिमा तिची नणंद नाही तर बहीण आहे. Fabulous Lives of Bollywood Wives या सीरिजच्या तिसरा भाग हा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/