बॉलिवूडमधील सर्वात प्रेमळ जोडप्यांपैकी एक असलेल्या रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस युरोपमध्ये (ब्रसेल्स) साजरा करत आहेत. या जोडप्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
१४ नोव्हेंबर रोजी पॉवर कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे जोडपे आधीच युरोपला रवाना झाले आहेत. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी 2018 मध्ये इटलीतील लेक कोमो येथे लग्न केले होते.
लग्नाचा दिवस खास बनवण्यासाठी रणवीर-दीपिका काही दिवसांपूर्वी सुट्टी घालवण्यासाठी युरोपला रवाना झाले होते. या जोडप्याच्या एका चाहत्याने त्यांना ब्रुसेल्स, युरोपमध्ये पाहिले. इतकेच नाही तर चाहत्याने त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून रणवीर-दीपिकाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दुसऱ्या फोटोमध्ये रणवीर आणि दीपिका चाहत्यांसोबत पोज देताना दिसत आहेत. दीपिकाच्या फॅन पेजने तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
एक दिवस आधी म्हणजेच १४ नोव्हेंबरला रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्रामवर 'गोलियों की रासलीला: राम लीला'च्या सेटवरील पडद्यामागील छायाचित्रे शेअर केली होती. या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते आणि दोघेही या चित्रपटाच्या सेटवरच प्रेमात पडले होते.