बॉलिवूड चित्रपट 'सिंघम अगेन' सध्या चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच अभिनेत्री दीपिका पदुकोणचा चित्रपटातील लूक दिग्दर्शक रोहित शेट्टीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या तिच्या ह्या डॅशिंग लूकची जोरदार चर्चा होत आहे.
रोहित शेट्टीने नुकतंच दीपिकाचा चित्रपटातील लूक शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये, रोहित शेट्टीने दीपिकाला हिरो म्हटलं आहे. ‘सिंघम अगेन’च्या नव्या पोस्टरमध्ये दीपिका डोळ्याला ब्लॅक गॉगल आणि अजयची वाघासारखी आयकॉनिक पोज देताना ती दिसते. "माझी हिरो, रीलमध्येही आणि रियलमध्येही. लेडी सिंघम", असं कॅप्शन रोहितने दीपिकाचा फोटो शेअर करताना दिलेली आहे.
रोहित शेट्टीने शेअर केलेल्या या नव्या पोस्टरवर दीपिकाने ‘Let’s Do This!’ म्हणत कमेंट केली आहे. #लेडीसिंघम #शक्तीशेट्टी असा ही हॅशटॅग वापरलाय. सध्या दीपिकाचा हा फोटो तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.
असे असतानाच पती आणि बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने देखील दीपिका पदुकोणच्या या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाचा लूक पाहून रणवीर सिंग प्रचंड प्रभावित झाला. त्याने दीपिका पदुकोणचा हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करून या फोटोला 'शेरनी' अशी कॅप्शन दिली आहे. अन् सिंहिणीचा इमोजी तयार केला आहे. दीपिका पदुकोण 'सिंघम अगेन' चित्रपटात आयपीएस शक्ती शेट्टीच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे.
रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात अजय देवगण, दीपिका पदुकोण, करीना कपूर, टायगर श्रॉफ असे कलाकार दिसणार आहेत. त्याचबरोबर अक्षय कुमार आणि रणवीर सिंग या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत. 'सिंघम' आणि 'सिंघम २' दोन्हीही चित्रपट हिट ठरले. आता चाहते तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'सिंघम अगेन' या चित्रपटाची धमाल पाहता तो बॉक्स ऑफिसवरही हिट होणार आहे, असा अंदाज बांधता येतो. सध्या चित्रपटाची शूटींग सुरु आहे. चित्रपट २०२४ मध्येच रिलीज होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचं एकूण बजेट २५० कोटी रुपयांचे बोलले जात आहे.