अभिनेत्री रवीना टंडनची आगामी सिरिज 'कर्मा कॉलिंग'चा टीजर प्रदर्शित झाला आहे. ही सिरिज डिझ्नी प्लस हॉटस्टारवर प्रसारित केली जाणार आहे.
अभिनेत्री रवीना टंडन लवकरच 'कर्मा कॉलिंग' या नव्या सिरिजमध्ये दिसणार आहे. ही सिरिज डिझ्नी प्लस हॉटस्टारवर प्रसारित केली जाणार आहे. नुकतेच या सिरिजचा टिझर प्रदर्शित झाला आहे. या सिरिजमध्ये रविनाने इंद्राणी कोठारी ही व्यक्तीरेखा साकारली आहे. टिझरमध्ये तिचा अंदाज अतिशय भारी वाटत आहे, पण सोबतच ती अतिशय गर्विष्ठ आणि अहंकारी दाखवण्यात आली आहे.
अभिनेत्रीचा रुबाबदार अंदाज
रविना टंडनने या सिरीजमध्ये जरा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अलिबाग सोसायटीवर हुकूमत गाजवणारी इंद्राणी कोठारी अशी तिची व्यक्तिरेखा आहे. त्यामुळे तिचा राजेशाही थाट पाहता येणार आहे. टीझरच्या सुरुवातीलाच साजशृंगार केलेली रविना टंडन आपल्या दृष्टीस पडते आणि मागून आवाज येतो, “यश मिळवण्याकरिता कोणताच नियम नसतो, आपले आदर्श, तत्वं, जवळचे लोक असं काही नसतं.”
मागून येणारा हा आवाज रविनाचाच आहे. ती पुढे म्हणते, “लोकं म्हणतात, करावे तसे भरावे परंतु मी म्हणते की, जेव्हा जग तुमच्या पायाशी असेल तेव्हा कर्म देखील काही करू शकत नाही.”
टीझर पाहिल्यानंतर रविनाच्या ग्लॅमरस व्यक्तिरेखेची कल्पना येते. आरएटी फिल्म्सने या फिल्मची निर्मिती केली आहे अन् रूचि नारायण या सिरिजची दिग्दर्शिका आहे.
रविनाची ही सिरिज पुढील वर्षी म्हणजेच २६ जानेवारी २०२४ रोजी डिझ्नी प्लस हॉटस्टारवव प्रदर्शित होणार आहे. 'कर्मा कॉलिंग' ही फिल्म अमेरिकन मालिका 'रिव्हेंज' वर आधारित आहे,
आपल्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना रविनाने सांगितले की, ती अशाप्रकारची भूमिका पहिल्यांदाच करत आहे. या सिरिजमधील इंद्राणी ही स्वतःच्या जगात वावरते. या भूमिकेमुळे कलाकार म्हणून मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. यासाठी मी डिझ्ने प्लस हॉटस्टारची आभारी आहे.
निर्माते आशुतोष शाह यांनी सांगितले की, 'कर्मा कॉलिंग' ही अतिशय मनोरंजक मालिका आहे. ही एक थरारक कथा आहे जी श्रीमंतांच्या जगाची आकर्षक झलक देते. आशुतोषनेही रवीनाच्या टॅलेंट आणि मेहनतीचे कौतुक केले.
रवीना टंडन आगामी अक्षय कुमारसोबत 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. रवीना नुकतीच 'वन फ्रायडे नाईट' या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट २८ जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला. याशिवाय रवीना 'KGF- Chapter 2' या ब्लॉकबस्टर चित्रपटातही दिसली होती.