फ्रान्समध्ये झालेल्या ७७व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या लूकने सर्वांची मने जिंकली, मात्र तुटलेल्या हातासोबत अभिनेत्रीला पाहून चाहते प्रचंड चिंतेत पडले. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या खांद्यावर स्लिप घालून पोहोचली आणि तिने प्लॅस्टर केलेल्या हाताने कॅमेरासमोर पोज दिली. ऐश्वर्याला या अवस्थेत पाहून प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला की तिचा हात कसा तुटला? आता याचे खरे कारण समोर आले आहे, जाणून घेऊया घटनेच्या दिवशी अभिनेत्रीचे काय झाले होते?
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्यानंतर, अभिनेत्री तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत मुंबईला परतली आणि 20 मे रोजी ती तिच्या तुटलेल्या हाताने मतदान करण्यासाठी आली, त्यावेळीही तिचा हात प्लास्टरमध्ये होता. ऐश्वर्याचा हात कसा मोडला? मिड डेने दिलेल्या वृत्तात याचे कारण समोर आले आहे..
ही घटना 11 मे रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, ऐश्वर्या त्या दिवशी घरातच पडली होती. ऐश्वर्या कशी पडली हे समजू शकले नसले तरी पडल्यामुळे तिचा हात मोडला, त्यामुळे तिच्या हाताला प्लास्टर लावावे लागले. आता परिस्थिती अशी आहे की तिचा हात सुजला असून शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ऐश्वर्याला काही कामाच्या कमिटमेंट्स होत्या आणि तिला कान्समध्ये हजेरी लावायची होती, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर अभिनेत्री कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्सला पोहोचली. रिपोर्टनुसार, हात मोडल्यानंतर दोनच दिवसांनी ऐश्वर्या रायने कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी तिच्या ड्रेसच्या फिटिंग सेशनमध्ये भाग घेतला होता.
डॉक्टरांनी ऐश्वर्याला सांगितले होते की, हातातील सूज कमी झाल्यानंतर तिची शस्त्रक्रिया केली जाईल. तथापि, अभिनेत्रीला सुमारे एक महिना खांद्यावर गोफ घालावी लागेल आणि फिजिओथेरपी देखील घ्यावी लागेल. तिला या काळात हातांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबात मतभेद असल्याच्या बातम्या गेल्या अनेक महिन्यांपासून समोर येत आहेत. मतभेदाच्या बातम्यांदरम्यान, ऐश्वर्याला तिचा पती अभिषेक आणि तिच्या कुटुंबाशिवाय अनेक वेळा स्पॉट केले गेले आहे. अलीकडेच जेव्हा ऐश्वर्या हातावर प्लास्टर लावून मतदान करण्यासाठी आली तेव्हा तिच्यासोबत अभिषेक किंवा कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)