Close

आयरा खानच्या हळदी समारंभाला सुरुवात, नऊवारी साडीत सजल्या नवरी मुलीच्या आई (Reena Dutta, Kiran Rao Wear Navvari Saree For Ira Khan And Nupur Shikhare Haldi Ceremony)

आमिर खानची लाडकी लेक इरा खान तिच्या लग्नामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. उद्या म्हणजेच 3 जानेवारीला ती तिचा दीर्घकाळचा प्रियकर नुपूर शिखरे सोबत लग्न करणार आहे. खानच्या लग्नाचे फंक्शन्स सुरू झाले आहेत. तिच्या आई-वडिलांचे घर आणि सासरचे घर दोन्ही रोषणाईने सजवलेले आहे.

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाची सुरुवात हळदी समारंभाने होत आहे. आज त्यांची हळदी असून वधू-वर दोघांचेही कुटुंब हळदी सोहळ्यासाठी पोहोचले आहेत. आयरा खान मुस्लिम नव्हे तर हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करणार आहे. नुपूर महाराष्ट्रीयन असल्याने आयरा खानचे लग्नही महाराष्ट्रीयन पद्धतीने होणार आहे.

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या हळदी फंक्शनचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिची आई रीना दत्ता हिरव्या रंगाच्या नऊवारी साडीत दिसत आहे, तर आमिरची माजी पत्नी किरण रावही नऊवारी साडीत आणि केसात गजरा माळलेली पाहायला मिळतेय. दोघीही हळदीचा शगुन घेऊन जावई नुपूर शिखरेच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांचे दोन्ही कुटुंब खूप आनंदी दिसत आहेत.

याआधी आमिर खानच्या घरचा व्हिडिओही व्हायरल झाला होता,तो मुलगी आयरा खानच्या लग्नासाठी पूर्णपणे तयार आहे. तिची आई रीना दत्ता आणि आयरा खान यांचे सासरचे घरही दिव्यांनी उजळून निघाले आहे, ते पाहता लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर आयरा खान आणि नुपूर 3 जानेवारीला कोर्ट मॅरेज करणार आहेत. यानंतर उदयुपरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. या दोघांच्या लग्नाचे फंक्शन 3 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान होणार आहे. आयरा खानचे काका आणि आमिर खानचा भाऊ फैसल खान यांनीही ही माहिती दिली आहे. त्याने सांगितले की लग्नानंतर 13 जानेवारीला एक भव्य रिसेप्शन आयोजित केले जाईल ज्यामध्ये सर्व बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहतील.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/