Close

रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी मुलीचं ठेवलं अरबी नाव, पहिल्यांदाच शेअर केला लेकीचा फोटो (Richa Chadha And Ali Fazal Name Their Daughter Zuneyra Ida Fazal)

बॉलीवूड अभिनेत्री रिचा चड्ढा व अभिनेता अली फजल काही महिन्यांपूर्वी आई-बाबा झाले. या जोडप्याला कन्यारत्न झालं. त्यांनी मुलीचं नाव काय ठेवलंय, याबाबत चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. अखेर या जोडप्याने मुलीचं नाव जाहीर केलं आहे. रिचा व अली यांनी त्यांच्या मुलीचं नाव खूपच हटके ठेवलं आहे.

अली व रिचा यांनी जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०२० मध्ये करोनाच्या पहिल्या साथीत विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न केलं होतं. करोना काळात लग्न केल्याने त्याबद्दल कोणालाच माहीत नव्हतं. त्यानंतर दोन वर्षांनी २०२२ मध्ये त्यांनी मित्र व कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. यावर्षी जुलै महिन्यात ते आई-बाबा झाले. रिचाने १६ जुलै २०२४ रोजी मुलीला जन्म दिला. आता जवळपास चार महिन्यांची त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव समोर आलं आहे.

रिचा व अलीने आपल्या मुलीचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तसेच त्यांनी आपल्या मुलीचे सुंदर नावही उघड केले आहे. रिचा व अली यांनी त्यांच्या मुलीचे नाव ज्वाला फजल ठेवावे, असं जावेद अख्तर यांनी सुचवलं होतं. मात्र या जोडप्याने त्यांच्या मुलीचं नाव जुनैरा इदा फजल (Zuneyra Ida Fazal) असं ठेवलं आहे. ‘वोग’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लेकीचं नाव सांगितलं.

जुनैरा हे अरबी नाव आहे. अरबी भाषेत याचा अर्थ ‘गाइडिंग लाइट’ म्हणजेच मार्ग दाखवणारा प्रकाश असा होतो. इंग्रजीमध्ये या शब्दाचा अर्थ ‘फ्लॉवर ऑफ पॅराडाइज’ म्हणजेच स्वर्गातील फूल असा होतो.

रिचा मुलाखतीत म्हणाली, “मला एक वर्षापूर्वीपर्यंत बाळ नको होतं. हवामान बदल हे त्यामागचे सर्वात मोठे कारण होते. पण माझी खूप जवळची मैत्रीण दिया मिर्झाने मला समजावलं. आता माझ्या घरात माझ्या बाळासाठी ज्या गोष्टी आहेत त्या सर्व दिया गरोदर असल्यापासूनच्या आहेत.”

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/