गेले कित्येक दिवस प्रेक्षकांना मराठी बिग बॉसची उत्सुकता लागली होती. वर्ष उलटून गेलं तरी शोचा काही नामोनिषाण नव्हतं. पण अखेर आता प्रेक्षकांची उत्सुकता संपली आहे. कलर्स वाहिनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅण्डलवर बिग बॉस मराठी ५ चा प्रोमो पोस्ट केला आहे.
पण यावेळी या शोमध्ये मोठा बदल केला आहे. दरवेळी महेश मांजरेकर या शोचे सूत्रसंचालन करतात.पण यंदाच्या सीझनमध्ये महेश मांजरेकर ऐवजी रितेश देशमुखची वर्णी लागली आहे. प्रोमोमध्ये शो मधल्या १०० कॅमेऱ्यांवर रितेश देशमुख नजर ठेवताना दिसत आहे. हा प्रोमो पाहून सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आता यंदाच्या सीझनमध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून दिसणार याची सर्वांना उत्सुकता आहे.