Close

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते ऋतूराज सिंह यांचे निधन (Rituraj Singh Passed Away)

अभिनेता ऋतूराज सिंह यांनी वयाच्या ५९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. पण त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता ऋतुराज सिंहचे निधन झाले आहे. वयाच्या ५९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ऋतुराज हे स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे. ऋतुराज यांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ही माहिती ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

ऋतुराज सिंह यांनी१९९३ मध्ये टीव्हीवर प्रसारित झालेल्या होगी अपनी बात, ज्योती, हिटलर दीदी, शपथ, वॉरियर हाय, आहट आणि अदालत, दिया और बाती हम यांसारख्या अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सध्या ऋतुराज सिंह हे लोकप्रिय टीव्ही शो अनुपमामध्ये दिसले होते. अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजल्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. ऋतुराजने ये रिश्ता क्या कहलाता है यासह इतर अनेक लोकप्रिय टीव्ही शोमध्येही काम केले आहे. अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ऋतुराज सिंह यांचे पूर्ण नाव ऋतुराज सिंह चंद्रावत सिसोदिया होते. त्यांचा जन्म राजस्थानमधील कोटा येथे सिसोदिया राजपूत कुटुंबात झाला.

ऋतुराज सिंह यांनी दिल्लीत शालेय शिक्षण पूर्ण केले. १९९३ मध्ये मुंबईत आले आणि अभिनयाला करिअर म्हणून निवडले. ऋतुराजने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात एक खेल राजनीती, बद्रीनाथ की दुल्हनिया इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे. ऋतुराज सिंगने दिल्लीत बॅरी जॉन्स थिएटर ॲक्शन ग्रुप (TAG) सोबत १२ वर्षे थिएटरमध्ये काम केले आणि झी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या तोल मोल के बोल या लोकप्रिय हिंदी टीव्ही गेम शोमध्ये काम केले.

सोशल मीडियावर कलाकारांकडून तसेच चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Share this article