अलीकडेच, सैफ अली खान आपल्या चार मुलांबद्दल - सारा अली खान, इब्राहिम अली खान, तैमूर अली खान आणि जेह अली खान बद्दल उघडपणे बोलला. मुलाखतीदरम्यान सैफने सांगितले की, तो त्याचा मुलगा इब्राहिमला रिलेशनशिपचा सल्ला देतो, तर सारासोबत अभिनयाबद्दल खूप बोलतो.
सैफ अली खान त्याच्या व्यावसायिक आयुष्यात जितका यशस्वी आहे तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही कौटुंबिक माणूस आहे. शूटिंग संपल्यानंतर सैफ आपला उरलेला सर्व वेळ चार मुलांसोबत घालवतो.
त्याच्या ताज्या मुलाखतीत सैफ अलीने त्याच्या चौघांबद्दल सांगितले. त्याची चार मुलं त्याच्याशी काय बोलतात, काय सल्ला विचारतात? त्याचा मुलगा इब्राहिम अलीबद्दल सैफने सांगितले की, तो त्याच्याशी त्याच्या रिलेशनबद्दल खूप बोलतो. एकदा इब्राहिमने तरुण वयात नातेसंबंधांना किती गांभीर्याने घ्यायचे असा प्रश्नही विचारला होता. यावर सैफने रिलेशनशिपला नेहमीच गांभीर्याने घेतले पाहिजे असे उत्तर दिले होते.
साराबद्दल बोलताना सैफ म्हणाला की, ती नेहमीच अभिनयाबद्दल बोलत असते.
तर तैमूर लोकांसमोर काहीही बोलायला घाबरतो. तो लाजाळू स्वभावाचा आहे. पण आता तो शालेय नाटकांमध्ये रस घेऊ लागला आहे. त्याची भीती गायब होत आहे. सर्वात लहान जेहबद्दल बोलताना सैफ म्हणाला की जेह हा जन्मजात कलाकार आहे.