Close

दिवाळी निमित्त सलमान कतरिनाची चाहत्यांना खास ट्रिट, टायगर ३ चे जोरदार प्रमोशन सुरु  (Salman Khan And Katrina Kaif Wish Diwali Together To Fans, Tiger-3 Release Soon)

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. पण याआधी सलमान खान आणि कतरिना कैफ सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आले आहेत.

इंडस्ट्रीचा दबंग स्टार सलमान खान आणि कतरिना कैफचे चाहते टायगर 3 ची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर 'टायगर 3' हा चित्रपट 12 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. अॅक्शनने भरलेला हा चित्रपट रिलीज होताच सलमान आणि कतरिनाने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सलमान खान आणि कतरिना कैफने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एथनिक लूकमध्ये एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला असून, चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत कतरिना साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने आपले केस मोकळे ठेवले आहेत. कमीत कमी मेकअपमध्येही ती फार सुंदर दिसत आहे.

दुसरीकडे, सलमान खान देखील लाल-मरून रंगाचा कुर्ता पायजमा परिधान करून अतिशय देखणा दिसत आहे. सलमान आणि कतरिना दोघेही एकत्र उभे राहून कॅमेऱ्यासमोर पोज देताना छान दिसत आहेत.

सलमान आणि कतरिनाने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही मिनिटांतच त्याचा हा फोटो इंटरनेटवर व्हायरल होऊ लागला. सलमान आणि कतरिनाच्या या पोस्टवर चाहते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत.

सलमान आणि कतरिनाने एकत्र दिवाळीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या चाहत्यांना खूश केले आहे. या दिवाळीत टायगर 3 सोबत धमाका करायला विसरू नका असेही म्हटले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटात सलमान, कतरिना आणि इमरान हाश्मीशिवाय शाहरुख खान, हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर कॅमिओ भूमिकेत आहेत.

Share this article