सलमान खानच्या प्रॉडक्शन कंपनीत बनलेल्या 'फर्रे' या चित्रपटातून अलिझेह अग्निहोत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अशा परिस्थितीत सलमान खान स्वतः तिला प्रमोट करत आहे. अलिझेह अग्निहोत्रीच्या मामुजानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर 'फर्रे'चे नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे - 'फर्रे'चा ट्रेलर उद्या येत आहे आणि निकाल २४ नोव्हेंबरला येईल. या पोस्टरमध्ये अलिझेहसह चित्रपटातील आणखी तीन कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे.
नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला. सलमान खानने भाची अलिझेह अग्निहोत्रीचा पहिला चित्रपट 'फर्रे'चे पोस्टर शेअर करत चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याबाबतची माहिती दिली आहे.
अलिझेह अग्निहोत्री व्यतिरिक्त 'फर्रे'मध्ये सौमेंद्र पाधी, साहिल मेहता, जेन शॉ, प्रसन्ना बिश्त, रोनित बोस रॉय, जुही बब्बर सोनी आणि नवीन येरनेनी यांसारखे स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांनी केले आहे, ज्यांना याआधी ‘जामात्रा’ मालिकेमुळे बरीच प्रसिद्धी मिळाली आहे.