Close

‘गुलाबी साडी’च्या भरघोस प्रतिसादानंतर संजू राठोडच्या ‘Bride नवरी तुझी’ गाण्याचीही क्रेझ ( Sanju Rathod New Song Bride Tuzi Navari Release )

सध्या सर्वत्र लगीनघाई सुरू असलेली पाहायला मिळत आहे. सर्वत्र लग्नाचे वारे वाहत असतानाच हळदी समारंभात स्पेशल गाण्यांवर वऱ्हाडी मंडळी ठेका धरताना दिसतात. यातच भर घालत आता यापुढील हळदी समारंभात आणखी एक ठसकेबाज गाणं नेहमी वाजणार. या गाण्याच्या प्रोमोने सर्वांची उत्सुकता अधिक वाढवून ठेवली आहे. यंदाच्या हळदी समारंभाला 'Bride तुझी नवरी' हे गाणं वऱ्हाडी मंडळींना थिरकायला भाग पाडणार हे नक्की.

'गुलाबी साडी' या गाण्याची जगभरात क्रेझ असलेली पाहायला मिळत आहे. गुलाबी साडीवर अनेक ट्रेंडिंग रील व्हिडीओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. कलाकार मंडळींपासून ते अगदी सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाला या गाण्याने भुरळ घातली आहे. या गाण्याचे बोल आणि गाण्याच्या हुकस्टेपने साऱ्यांनाच वेड केलं. आता या गाण्याच्या भरघोस प्रतिसादानंतर संजू राठोड आणि 'बिग हिट मीडिया' नवकोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहे. यंदाच्या हळदी समारंभात हे गाणं आवर्जून वाजेल याची खात्री आहे.

https://youtu.be/YXoQcirq2do?si=YST39kPXupkZBWzA

या गाण्यात 'लागीर झालं जी' फेम अभिनेता नितीश चव्हाण आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील थिरकताना दिसत असून संजू राठोडच्या रॅपने साऱ्यांची बोलतीच बंद केली आहे. तर या गाण्यात सहकलाकार म्हणून हृतिक मनी आणि निमरित मनी यांनीही ठेका धरलेला पाहायला मिळतोय. 'Bride तुझी नवरी' हे गाणं संजू राठोडचं असून 'बिग हिट' मीडिया प्रस्तुत आहे.

निर्माते हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी या गाण्याच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे. तर गाण्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनिष महाजन याने उत्तमरित्या पेलली आहे. गाण्याचे बोल संजू राठोडचे असून हे गाणं संजूसह आनंदी जोशी हिने गायलं आहे. तर संगीताची संपूर्ण जबाबदारी गौरव राठोड (G-Spark) याने सांभाळली आहे. गुलाबी साडी नंतर आता संजूच्या 'Bride तुझी नवरी' या आगामी गाण्याची क्रेझ वाढत असलेली पाहायला मिळत आहे.

Share this article