Close

सारा अली खानची दमदार भूमिका असलेला ए वतन मेरे वतन चा ट्रेलर रिलीज ( Sara Ali Khan Fame Most Awaited Ae Watan Mere Watan Movie Trailer Release)

सारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित आहे. १९४२ च्या भारत छोडो आंदोलन या सत्य घटनेवर आधारित असलेला हा सिनेमा, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या एका अतिशय खास आणि वेगळ्या पैलूची कथा दाखवतो. या महिन्यात OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर हा चित्रपट रिलीज होणार आहे.

देशभक्तीवर असलेल्या ए वतन मेरे वतन या सिनेमाची निर्मिती करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी केली आहे. कन्नन अय्यर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाची कथा अय्यर आणि दरब फारुकी यांनी लिहिली. यामध्ये सारा अली खान मुख्य भूमिकेत पाहायला मिळेल. इमरान हाश्मी, सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, ॲलेक्स ओ'नील आणि आनंद तिवारी यांच्या सुद्धा महत्वाच्या भूमिका असतील.

'ए वतन मेरे वतन' हा सिनेमा येत्या २१ मार्च रोजी भारतात तसेच २४० देशांमध्ये ओटीटीवर रिलीज होईल. हिंदीशिवाय तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतही हा सिनेमा पाहता येणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जातो. मुंबईत राहणाऱ्या २२ वर्षीय कॉलेजात शिकणाऱ्या उषा चीही कथा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या प्रयत्नात ती गुप्तपणे एक रेडिओ स्टेशन चालवते आणि हे रेडिओ स्टेशन भारत छोडो आंदोलनासाठी सर्वात मोठे कामाचे ठिकाण बनते. साराच्या पात्रामुळे त्याकाळातील देशातील तरुणांचे धैर्य, त्यांचे बलिदान आणि स्वातंत्र्यलढ्यातील अडचणींना तोंड देण्याची त्यांची क्षमता पाहायला मिळते

https://youtu.be/LIq144fT4c4?si=LPRvJm2AQd-mqSo5

साराने या सिनेमासाठीच्या भावना व्यक्त करत म्हटले की, 'ऐ वतन मेरे वतन'मध्ये एवढी दमदार व्यक्तिरेखा साकारणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे, जो शब्दात व्यक्त करता येणार नाही. मी भाग्यवान आहे की मला हे पात्र साकारण्याची संधी मिळाली, ज्यासाठी मी त्याच्या दृष्टीकोनातून गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कशामुळे प्रेरणा मिळते आणि प्रोत्साहन मिळते हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा चित्रपट आपल्याला अगणित नसलेल्या नायकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. हे मानवी भावना आणि धैर्याचे उदाहरण देखील सादर करते. मला या सिनेमॅटिक प्रवासाचा एक भाग बनण्याची संधी दिल्याबद्दल मी दिग्दर्शक कन्नन अय्यर, धर्मिक एंटरटेनमेंट आणि प्राइम व्हिडिओची टीम यांची आभारी आहे. 'ए वतन मेरे वतन' ही आपल्या देशातील विशेषत: तरुणांच्या मनातल्या भावनांची कथा आहे, आता ही कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल त्यामुळे २१ मार्चची मी आतुरतेने वाट पाहत आहे.

Share this article