एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिचा वेगळा स्वभावही पाहायला मिळतो. व्हिडिओमध्ये ती फ्लाइटमध्ये बसली असून चुकून तिच्या ड्रेसवर ज्यूस पडल्याने ती चिडलेली दिसत आहे. ती रागात एअर होस्टेसकडे पाहत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये सारा अली खान गुलाबी रंगाचा ड्रेस घातलाय. ती बिझनेस क्लासऐवजी इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करत असल्याचे पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या आजूबाजूला एअरलाइनचे क्रू मेंबर्स उभे आहेत. मध्येच ती एअर होस्टेसकडे रागाने बघत सीटवरून उभी राहते.
हा शूटिंगचा भाग असल्याचा काहींचा दावा
मात्र, हा व्हिडिओ कोणत्यातरी शूटचा असल्याचे सांगण्यात येत आहे. साराच्या वागण्यावरून ती जाहिरात किंवा चित्रपटाचे शूटिंग करत असल्याचे बहुतेकांचे म्हणणे आहे.
येत्या काळात ती धर्मा प्रॉडक्शन आणि सिख्या एंटरटेनमेंटच्या ॲक्शन कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये ती पहिल्यांदा आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करेल