बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे यांनी फार कमी वेळात इंडस्ट्रीत आपली छाप पाडली आहे. या तिन्ही अभिनेत्रींनी जवळपास एकाच वेळी बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि या सर्वच आपल्या फिल्मी करिअरमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. अभिनय, सौंदर्य आणि ग्लॅमरस शैली चाहत्यांनाही आवडते, पण सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे यांच्यापैकी सर्वात श्रीमंत कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया नेट वर्थच्या बाबतीत कोणत्या अभिनेत्रीने बाजी मारली आहे.
या तीन अभिनेत्रींपैकी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 2018 मध्ये, जान्हवीने 'धडक' चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते, ज्यामध्ये ती इशान खट्टरसोबत दिसली होती.
सारा अली खाननेही त्याच वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये 'केदारनाथ' चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत साराच्या सोबत दिसला होता. तर अनन्या पांडाने 2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटाद्वारे तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.
कोइमोईच्या रिपोर्टनुसार, सारा अली खान एका चित्रपटासाठी 3 कोटी रुपये फी घेते. याशिवाय सारा ब्रँड एंडोर्समेंटसाठी एक कोटी रुपये घेते. ती एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 35 लाख रुपये घेते. तिच्याकडे मुंबईत 1.5 कोटी रुपयांची जागा असून तिची एकूण संपत्ती 41 कोटी रुपये असल्याचेही बोलले जाते आहे.
जान्हवी कपूरच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती 82 कोटी रुपये आहे. जान्हवी एका चित्रपटासाठी ५ कोटी रुपये फी घेते आणि ब्रँड एंडोर्समेंटसाठी ती अडीच ते तीन कोटी रुपये घेते. याशिवाय त्यांच्याकडे 39 कोटी रुपयांची खासगी जागा आहे.
चंकी पांडेची लाडकी अनन्या पांडेबद्दल सांगायचे तर ती एका चित्रपटासाठी ३ कोटी रुपये मानधन घेते. अनन्या ब्रँड एंडोर्समेंटसाठी 60 लाख रुपये आणि इंस्टाग्रामवरील पोस्टसाठी 50 लाख रुपये चार्ज करते. अनन्याकडे BMW 7 Series, Range Rover Sport, Mercedes Benz E Class सारख्या अनेक लक्झरी कार आहेत. रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती 74 कोटी रुपये आहे.
तथापि, रिपोर्ट्सनुसार, सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे यांच्यामध्ये जान्हवी कपूरकडे सर्वाधिक संपत्ती आहे, म्हणजेच कमाई आणि मालमत्तेच्या बाबतीत जान्हवी कपूर सारा आणि अनन्यापेक्षा पुढे आहे.