माझी प्रकृती व्यवस्थित : अभिनेते सयाजी शिंदे
सातारआता काळजी करण्यासारखं काही कारण नाही, असे आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून केले आहे. माझ्यावर प्रेम करणारे सर्व रसिक, माझे हितचिंतक सर्वांच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेत. मी प्रिकॉशन म्हणून चेक-अप केलं होतं, त्याच्यात एक ब्लॉकेज होतं. मग पुढील अनर्थ टाळण्यासाठी हे मी शस्त्रक्रिया करून घेतली आहे. लवकर तुमच्या मनोरंजनासाठी उपस्थित राहीन. तुम्ही ज्या बातम्या ऐकत आहात त्या जशास तसे नाहीत. मी चांगला आहे, तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
काल सकाळी सयाजी शिंदेंवर शस्त्रिक्रिया करण्यात आली. तेव्हा पासून त्यांच्या तब्येतीसाठी त्यांचे चाहते चिंता व्यक्त करत होते. आता त्यांनी नुकताच व्हिडिओ शेअर करुन आपल्या तब्येतीची बातमी दिली आहे. तसेच चाहत्यांना निश्चिंत राहण्यास सांगितले आहे.