Close

सर्वसामान्य माणसाच्या एक महिन्याचा खर्च निघेल… इतक्या महागड्या कपमध्ये शाहरुख खान पितो कॉफी… (Shahrukh Khan Super Expensive Coffee Mug Price Is 35 Thousand)

शाहरुख खान जगातील सर्वात आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तुम्ही कोणत्याही देशात जा, तुम्हाला किंग खानचा एक तरी डाय-हार्ड फॅन नक्कीच सापडेल. किंग खानला त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या सभ्य वागणुकीमुळे देखील पसंत केले जाते. विशेषतः महिला चाहत्यांशी त्याचे कनेक्शन वेगळे आहे. स्टाईलच्या बाबतीतही तो कुणापेक्षा कमी नाही आणि गॅजेट्सबद्दल बोलायचं झालं तर त्यातही शाहरुखचा हात कोणी धरणार नाही. या बाबतीतही तो खूप हायटेक आहे. त्याच्याकडे अनेक फॅन्सी गोष्टी आहेत ज्या त्याच्या जवळच्या लोकांना आणि चाहत्यांना आवडतात. यापैकी एक कप आहे. शाहरुखचे घर मन्नत, त्याची हायटेक व्हॅनिटी व्हॅन बरोबरच या सुपरस्टारच्या महागड्या आणि लक्झरी गोष्टींची अनेकदा चर्चा होते. आज आपण त्याच्या फॅन्सी कॉफी मगबद्दल बोलणार आहोत. शाहरुख खानने २०१७ मध्ये त्याच्या मगसह एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये तो त्याच्या कॉफीच्या मगमधून एक चुस्की घेताना दिसत होता.

शाहरुख खानचा कॉफी मग खास का आहे?

व्हिडीओमध्ये किंग खान ज्या कॉफी मगचा वापर करताना दिसत आहे. त्या कॉफी मगमध्ये हिटर आणि एलईडी लाइटिंग यांसारखे फिचर्स आहेत. या कॉफी मगला एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही तीन तासांपर्यंत मगचा वापर करु शकता. एवढंच नाही तर या मगसोबत चार्जिंग कोस्टरही येतो. या मगवर प्लस आणि मायनसचे चिन्ह देण्यात आले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तापमान तुमच्यानुसार ठरवू शकता…

किंग खान याच्या काळ्या रंगाच्या कॉफी मगची चर्चा सध्या तुफान रंगत आहे. तुम्हालाही खास वैशिष्ट्यांसह हा कॉफी मग खरेदी करायचा असेल तर या कॉफी मगची ऑनलाइन किंमत ३५ हजार ८६२ रुपये आहे.

शाहरुख खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, शाहरुख खानचा ‘जवान’ सिनेमा ७ सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘जवान’ सिनेमात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण, नयनतारा, विजय सेतुपती, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Share this article