Close

शाहरुखचा मुलगा आर्यन खान खरंच प्रेमात पडलाय का? (Shahrukh’s Son Aryan Khan Dating This Actress?)

शाहरुख खानची मुलगी सुहाना वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात आली आहे. त्यामुळे ती प्रकाशझोतात असतेच पण आर्यन खान देखील बऱ्यापैकी चर्चेत असतो. सध्या आर्यन खान हा शाहरुख खानसोबत दिग्दर्शनमध्ये करिअर करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. किंग खानचा मुलगा बॉलिवूडमध्ये येईल की नाही माहीत नाही पण त्याचा मुलगा एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.

मीडिया रिपोर्ट्नुसार आर्यन खान कोणत्या भारतीय अभिनेत्रीला नाही तर ब्राझिलियन अभिनेत्री आणि मॉडेलला डेट करत असल्याचे समजते. लॅरिसा बोनेसी असे या अभिनेत्रीचे नाव आहे. लॅरिसा बोनेसी हिने गो गोवा गॉन आणि देसी बॉयज सारख्या चित्रपटात काम केले आहे. तिने साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. नुकताच आर्यन खान आणि लॅरिसा बोन्सीचा एक व्हिडिओ समोर आला होता.

रेडिटवर एका ॲक्टिव्ह थ्रेडनं आर्यन खानचा ब्राझीलची अभिनेत्री लॅरिसा बोन्सीबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानं हा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय, काही दिवसांआधी मी रेडिटवर एक कमेंट केली होती की, आर्यन खान लॅरिसा बोन्सीला डेट करत आहे. नंतर मी त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट्स चेक केले. तर लक्षात आले की आर्यन खान लॅरिसाच्या संपूर्ण फॅमिलीला इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. अन्‌ लॅरिसा देखील आर्यनच्या फॅमिलीला फॉलो करते.

इतकंच नाही तर लॅरिसाच्या डॉगच्या अकाऊंटवरुनही आर्यनला फॉलो केलं आहे. लॅरिसाच्या आईच्या बर्थडेला आर्यनने खास गिफ्ट देखील पाठवलं होतं. ज्याचा फोटो तिच्या आईनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. इतकंच नाही तर काही महिन्यांआधी मार्टिन गॅरिक्सच्या कॉन्सर्टमध्ये आर्यन, लॅरिसा आणि तिची बहिण एकत्र दिसले होते.

लॅरिसाबद्दल आणखी माहिती सांगायची झाल्यास, सोशल मीडियावर ती कमालीची ॲक्टिव्ह आहे. ६००K हून अधिक लोक तिला फॉलो करतात. लॅरिसा आणि आर्यन खान एकमेकांना डेट करत आहेत की याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चांमुळे ते दोघे चर्चेत आले आहेत.

कोण आहे लॅरिसा बोनेसी

लॅरिसा बोनेसी ही ब्राझीलची मॉडेल आहे. ती एक डान्सर देखील आहे. याआधी तिने अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत “सुबाह होने ना दे” या ब्लॉकबस्टर गाण्यात काम केले आहे. तिने टायगर श्रॉफ आणि सूरज पांचोलीसोबत काही म्युझिक व्हिडिओ अल्बमही केले आहेत. ती एक चांगली डान्सर आहे. लॅरिसा बोनेसीने टॉलिवूड इंडस्ट्रीत ‘नेक्स्ट ॲनी’ आणि ‘थिक्का’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सैफ अली खानच्या ‘गो गोवा गॉन’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेतून तिने बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम, सोशल मीडिया)

Share this article