Close

सोनाक्षी आणि झहीर इक्बालच्या लग्नावर सिन्हा कुटुंबाची नाराजी? अभिनेत्रीचे बाबा आणि भावाचे वक्तव्य चर्चेत (Shatrughan Sinha is not happy with daughter Sonakshi’s wedding)

सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. या महिन्यात २३ जून रोजी दोघेही लग्न करणार असल्याच्या बातम्या आहेत. सोनाक्षीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी लग्नाच्या ठिकाणापासून ते मेनूपर्यंतची सर्व माहिती समोर आली आहे. दरम्यान, सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि भाऊ लव सिन्हा यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांची प्रतिक्रिया पाहून सिन्हा कुटुंबीय या लग्नावर खूश नसून नाराज असल्याचं समजतं. शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, त्यांची मुलगी सोनाक्षीने अद्याप त्यांना लग्नाबद्दल काहीही सांगितलेले नाही सोनाक्षी जेव्हा त्यांना सांगेल तेव्हा ते या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी येतील, असेही ते म्हणाले.

सोनाक्षीच्या मुस्लीम बॉयफ्रेंडसोबतच्या लग्नाची बातमी जेव्हापासून व्हायरल झाली, तेव्हापासून तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे, आता तिची नाराजी वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्या वक्तव्याने स्पष्टपणे दिसून येत आहे. एका मुलाखतीदरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, "निवडणुकीच्या निकालानंतर मी दिल्लीत आलो. तिने मला या लग्नाबद्दल काहीही सांगितले नाही. मीडियाने जेवढे सांगितले आहे तितके मलाही माहीत आहे. तिचे लग्न होणार आहे, मग मी आणि माझी पत्नी तिला आशीर्वाद देऊ.

शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले की, "आमच्या मुलीच्या निर्णयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ती प्रौढ आहे आणि तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मला एवढेच सांगायचे आहे की, माझ्या मुलीचे लग्न झाल्यावर मला लग्नाच्या वरातीत नाचायला आवडेल. "माझ्या ओळखीचे लोकही मला विचारत आहेत की मला या लग्नाची माहिती का नाही, म्हणून मी एवढेच सांगू शकतो की आजकाल मुले त्यांच्या पालकांची परवानगी घेत नाहीत, ते फक्त माहिती देतात. आम्ही देखील वाट पाहत आहोत की आम्हाला हे कधी सांगितले जाईल ."

सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हा यानेही बहिणीच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. नुकतेच या विषयावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तो म्हणाला, "मी सध्या मुंबईत नाही. मात्र, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मला यावर भाष्य करायचे नाही आणि स्वत:ला यापासून दूर ठेवायचे आहे.म्हणजेच भाऊ लवनेही आपण या लग्नावर खुश नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सोनाक्षी आणि झहीर नोंदणीकृत विवाह करणार आहेत, त्यानंतर ते 23 जून रोजी लग्नाची पार्टी आयोजित करणार आहेत. काही सूत्रांचे म्हणणे आहे की दोघांनी आधीच त्यांच्या लग्नाची नोंदणी केली आहे आणि हे लग्न साजरे करण्यासाठी 23 जून रोजी पार्टीचे आयोजन केले आहे.

Share this article