गायक गुरू रंधावा आणि शहनाज गिल यांच्यातील बॉन्डिंग सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. आता या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर चाहत्यांनी या दोघांना, आता तुम्ही दोघं लग्न करा असं म्हटलं आहे.
बिग बॉस १३ या रिअॅलिटी शोमधून घराघरात प्रसिद्ध झालेली शहनाज गिल सध्या गुरु रंधावासोबत खूप वेळ घालवताना दिसत आहे. त्यांचे फोटो आणि मजेशीर व्हिडिओ पाहून चाहते खूश होत असतात. त्यांच्यातील बॉन्डिंग पाहून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा दावाही अनेकदा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर गुरू आणि शहनाज यांच्यात गुपचूप नातं निर्माण होत असल्याचंही चाहत्यांना वाटत आहे. या कारणास्तव चाहते त्यांच्या पोस्टवर कमेंट्स करताना त्यांनी लग्न करावं अशी कमेंट करत असतात. अशातच आता शहनाज गिल आणि गुरू यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओतील दोघांच्या डान्सने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
वास्तविक, शहनाज गिल स्वतःचे आणि गुरु रंधावाचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते, परंतु यावेळी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, पहिल्यांदा दोघे पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसतात. दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. यानंतर गुरू आणि शहनाज समोरासमोर येतात आणि कुस्तीची पोझिशन घेतात. त्याला पराभूत केल्यानंतरच शहनाज गुरूचा स्वीकार करेल असे दिसते. मग गायक असे काही करतो ज्याचा अंदाज शहनाजलाही नसेल. या व्हिडिओमध्ये दोघेही खूप क्यूट दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये शहनाजने लिहिले की, 'या... तुम्हाला भांगडा पाहायला मिळेल.' दोघांच्या या व्हिडिओने मनोरंजन विश्वातील चाहत्यांना आनंद दिला आहे.
चाहत्यांनी देखील यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शहनाज गिल आणि गुरु रंधावाच्या या व्हिडिओवर कमेंट करताना गायक अर्जुनने लिहिले, 'क्यूट बिबे.' या व्हिडिओवर चाहतेही मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. दोघांच्याही चाहत्यांना त्यांची स्टाईल खूप आवडली आहे, त्यामुळे या जोडीचे सर्वोत्तम म्हणून वर्णन केले जात आहे. एका चाहत्याने लिहिले, 'व्वा... किती सुंदर आहे.' दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, 'तुम्हा दोघांना पाहून मलाही भांगडा आला.' इतकंच नाही तर एका चाहत्याने 'तुम्ही दोघांनी लग्न करावं' असंही लिहिलं आहे. त्यांच्या केमिस्ट्रीवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.