Close

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं निधन, वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास (Shirish Kanekar Passed Away)

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं आज मुंबईत निधन झालं. वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते.

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं. प्रकृती अत्यावस्थामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते.. पण रुग्णालयातच आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

६ जून १९४३ रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला होता. तर मुंबई विद्यापीठाची कायद्याची पदवी त्यांनी संपादन केली होती. इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहात ते पत्रकार म्हणून नोकरीला लागले. पुढे त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात दीर्घकाळ वैविध्यपूर्ण लेखन केले. बॉलीवूड, आणि मराठी चित्रपट सृष्टीवरील त्याचं खुमासदार शैलीतील लेखन कायम रसिकांच्या स्मरणात राहील.

याशिवाय ते मुक्त पत्रकारिता, मराठीत स्तंभलेखनही करीत होते. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणावरील त्यांचे वृत्तपत्रांतील स्तंभ प्रसिद्ध आहेत. तर 'कणेकरी', 'फिल्लमबाजी', 'शिरीषासन' हे त्यांचे विनोदी लेख प्रसिद्ध आहेत.

Share this article