Close

शिवानी सुर्वेने सिनेमात काम मिळावं यासाठी हेमंत ढोमेला दिली होती जन्मपत्रिका (Shivani Surve Submitted Her Horoscope To Director Hemant Dhome To Cast Her In The Film)

मराठी सिनेमेदेखील थिएटरमध्ये उत्तम चालतात याचं आणखी एक उदाहरण म्हणजे झिम्मा २ हा सिनेमा. सध्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सिनेमात शिवानी सुर्वे या झिम्मा गर्लच्या गॅंगमध्ये नव्याने सहभागी झाली आहे. हा सिनेमा तिच्या पदरी कसा पडला याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

“मी आणि हेमंतने यापूर्वी एकत्र काम केलं आहे. त्याला मी ‘वाळवी’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला बोलावलं होतं. तेव्हा हेमंत ‘झिम्मा २’चं कास्टिंग करतोय याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. मी अगदी सहज त्याला म्हणाले तुला वाटतंय का माझ्यात काही समस्या आहे? म्हणूनच तू मला तुझ्या चित्रपटात पुन्हा घेतलं नाहीस बरोबर ना? त्याला सुरुवातीला काही समजलंच नाही मी नेमकं काय बोलतेय. यामागचं कारण असं की, आम्ही एकत्र एक सिनेमा केला होता त्याला प्रदर्शित व्हायला तब्बल चार ते साडे चार वर्ष लागली होती.”

“मला सिनेमात घेतलं की वेळ लागतो असा काही तुझा गैरसमज झालाय का? ही घे माझी पत्रिका…यात काहीच दोष नाहीये त्यामुळे मला कास्ट कर… असं माझं आणि हेमंतचं बोलणं झालं होतं. त्याला ही गोष्ट मी अगदी गंमतीत सांगितली होती.”

“दोन-चार दिवसांनी मला खरंच हेमंतचा फोन आला आणि तो मला म्हणाला, शिवानी पत्रिका कामी आली. माझ्या चित्रपटात अशी एक भूमिका आहे, तू करशील का? अर्थात गंमतीचा भाग बाजूला राहिला. मी मनालीची गंभीर भूमिका करू शकते असा त्याला विश्वास होता. हेमंतला हा विश्वास वाटणं हीच गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. क्षिती आणि हेमंतचं ‘झिम्मा’ या विषयावर खूप जास्त प्रेम आहे, त्यामुळे त्यांना जवळच्या वाटणाऱ्या चित्रपटात त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.”

झिम्माने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ८ कोटींचा गल्ला पार केला आहे.

Share this article