Close

धोका (Short Story: Dhoka)

  • हेमांगी प्रभू
    पंधरा वर्षांचं अंतर होतं, माई आणि दादांमध्ये. परंतु, दादांचे उमदे व्यक्तिमत्त्व आणि लहान वयात पित्याचं छत्र हरपलं असतानाही स्वकर्तबगारीवर पुढे आलेल्या दादांचं मंडपात होणारं कौतुक ऐकून माई आपली खंत विसरल्या आणि भावी संसाराची सुखद स्वप्नं रंगवतच बोहल्यावर चढल्या. नव्याचे नऊ दिवस हां हां म्हणता सरले. दादांच्या उजळ व्यक्तिमत्त्वाची काळी बाजू माईंना दिसू लागली…
    काचेच्या बाटलीतील सलाईन थेंबाथेंबाने दादांच्या निळ्याशार शिरेत ठिबकत होतं. सुया टोचून सुजलेला दादांचा हात, त्यांच्या अंगावरील पांढरीशुभ्र चादर, खोलीत भरलेला औषधांचा उग्र दर्प, अस्थिपंजर दादा आणि या सर्व भकास वातावरणात एक पाय मुडपून हातात जपमाळ घेऊन निर्विकारपणे बसलेल्या माई.
    उघड्या खिडकीतून थंडगार वार्‍याची मंद झुळूक आली आणि माईंच्या अंगावर एकदम शिरशिरी आली. त्या लगबगीने उठल्या, खिडकी लावून झाल्यावर त्यांनी एकटक दादांकडे पाहिले. छातीचा भाता हळुवारपणे वरखाली होत होता. आहेत, अजून जिवंत आहेत, माईंनी दीर्घ सुस्कारा सोडला आणि त् काचेच्या बाटलीतील सलाईन थेंबाथेंबाने दादांच्या निळ्याशार शिरेत ठिबकत होतं. सुया टोचून सुजलेला दादांचा हात, त्यांच्या अंगावरील पांढरीशुभ्र चादर, खोलीत भरलेला औषधांचा उग्र दर्प, अस्थिपंजर दादा आणि या सर्व भकास वातावरणात एक पाय मुडपून हातात जपमाळ घेऊन निर्विकारपणे बसलेल्या माई.
    उघड्या खिडकीतून थंडगार वार्‍याची मंद झुळूक आली आणि माईंच्या अंगावर एकदम शिरशिरी आली. त्या लगबगीने उठल्या, खिडकी लावून झाल्यावर त्यांनी एकटक दादांकडे पाहिले. छातीचा भाता हळुवारपणे वरखाली होत होता. आहेत, अजून जिवंत आहेत, माईंनी दीर्घ सुस्कारा सोडला आणि त्या सावकाश खुर्चीत बसल्या.
    दादांकडे पाहता पाहता माई भूतकाळात कधी शिरल्या, ते त्यांनाही कळलं नाही. लग्नाआधीचे दिवस माईंना आठवले. शिकण्याची केवढी उमेद होती आपल्याला. पण कॉलेजचं शिक्षणही पूर्ण करू दिलं नाही बाबांनी. लग्नाची घाई करणार्‍या वडिलांपुढे बोलण्याची आज्ञा नव्हती. पंधरा वर्षांचं अंतर होतं, माई आणि दादांमध्ये. परंतु, दादांचे उमदे व्यक्तिमत्त्व आणि लहान वयात पित्याचं छत्र हरपलं असतानाही स्वकर्तबगारीवर पुढे आलेल्या दादांचं मंडपात होणारं कौतुक ऐकून माई आपली खंत विसरल्या आणि भावी संसाराची सुखद स्वप्नं रंगवतच बोहल्यावर चढल्या.
    नव्याचे नऊ दिवस हा हा म्हणता सरले. दादांच्या उजळ व्यक्तिमत्त्वाची काळी बाजू माईंना दिसू लागली. एरवी सभ्य, सुसंस्कृत असलेला हा माणूस स्त्रियांच्या बाबतीत मात्र अगदीच सैल होता. लग्न होऊनही दादांनी इतर स्त्रियांशी असलेले संबंध काही तोडले नव्हते. छोट्या छोट्या पुराव्यांनी माईंच्या संशयाला पुष्टी दिली आणि न राहवून एके दिवशी त्यांनी दादांपुढे तोंड उघडलंच.
    ङ्गङ्घतुला व्यवस्थित खायला प्यायला मिळतं आहे ना. मग गुपचूप राहा आणि पुन्हा कधी मला जाब विचारायची हिंमत करू नकोस.फफ एरवी भित्र्या सशागत वावरणारी ही बाई आपल्याला जाब विचारते! हे दादांना सहन झालं नाही म्हणून त्यांनी तिला दम भरला आणि दादांचा हा निर्लज्जपणा पाहून माईंचा तोल सुटला. हाताला लागतील ते चार कपडे बॅगेत कोंबून त्यांनी माहेरची वाट धरली.
    लेक माहेरी परत आलेली पाहताच माईंचे कर्दनकाळ वडील कडाडले, ङ्गङ्घतू परत आलीसच कशी? परत फिर आल्या पावली. गुण्यागोविंदाने संसार करशील, तर चार दिवसांच्या माहेरपणासाठी फक्त उघडे आहेत या घराचे दार तुला. पुरुषाने नाही छंद करायचे, तर कोणी करायचे! बाकी तर काही कमी करत नाही ना तुला? नांदता येत असेल तर नांद, नाही तर मर. पण माझ्या घरात तुला जागा नाही!फफ
    माईंनी अगतिकतेनं स्वतःच्या आईकडे पाहिलं. पण ती दुबळी बाई मान खाली घालून अश्रू ढाळत राहिली.
    जीव द्यायची हिंमत नसलेल्या माई मुकाट नवर्‍याघरी परतल्या. आता दादांची हिंमत अधिकच वाढली. जणू काही माईंवर सूड घेतल्याप्रमाणे ते बाजारी बायकांना घेऊन घरी येत आणि माईंसमोर प्रणयाचे खेळ खेळत. माईंना मेल्याहून मेल्यासारखं होई. परंतु, अपुरं शिक्षण घेतलेल्या भित्र्या माईंमध्ये घराबाहेर पडण्याचं धैर्य उरलं नव्हतं. बाहेर सार्वजनिक ठिकाणी दादा माईंना समारंभांना घेऊन जात. पण मालकिणीची वस्त्रे ल्यायलेल्या माईंना समारंभात पत्नीचा मान मिरवताना, राहून राहून, घरात मात्र आपली जागा पाय पुसण्याची आहे, याची जाणीव बोचत असे.
    शेवटी विधात्यालाच दया आली आणि दोन-दोन वर्षांच्या अंतराने माईंना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. माईंच्या वैराण आयुष्यात नंदनवन फुलवणारी ही छोटुकली-धिटुकली आई… आई म्हणत आपल्या बोबड्या बोलांनी माईंना रिझवू लागली. बघता बघता या दोन चिमण्या जिवांनी माईंचं अवघं विश्‍व व्यापून टाकलं. आपल्या मुलांचे हट्ट पुरवताना, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देताना माईंना वेळ पुरेनासा झाला. त्यांनी आपल्या चिमुकल्या जगातून दादांना हद्दपार करून टाकलं. मुलं मोठी होऊ लागल्याने दादांनी घरात थेर करणं बंद केलं, परंतु बाहेर त्यांची प्रकरणं चालूच होती. आपल्या वडिलांचे प्रताप मुलांच्याही कानावर येत होते, परंतु दादांपुढे बोलण्याची कोणाचीही छाती नव्हती.
    काही वर्षांनी मुलीचं लग्न झालं. मुलाचं शिक्षण पूर्ण होऊन तोही मार्गी लागला, पण दादा मात्र होते तसेच राहिले. अजूनही ते
    पावलोपावली माईंचा अपमान करत आणि माई खाली मानेनं सर्व सहन करीत. स्वैराचारी दादांच्या लाथा खात मनोमन खंतावणारी आपली आई मुलाला बघवेना. एक दिवस संताप असह्य होऊन त्याने दादांना जाब विचारला.
    ङ्गङ्घमाझ्या घरात मी वाटेल तसं वागेन. तुला मान्य नसेल, तर चालता हो!फफ दादा ओरडले.
    मुलाने नेसत्या वस्त्रानिशी घर सोडलं. वारंवार विनवणी करूनही माईंनी मात्र त्याच्याबरोबर जाणं नाकारलं.
    ङ्गङ्घतुला तुझा संसार आहे. तू सुखी राहिलास की मी भरून पावले. तुझ्या संसारात आता माझी अडगळ नकोफफ, माईंनी निक्षून सांगितलं.

  • दिवस चालले होते आणि एका निराळ्याच संकटाची चाहूल घेऊन एक दिवस उजाडला. दादांना अचानक पक्षाघाताचा तीव्र झटका आला. उजव्या अंगावरून वारे गेल्यामुळे दादांनी अंथरूण पकडलं आणि माईंच्या कष्टांना परिसीमा उरली नाही. डॉक्टरांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की, रोज नियमित व्यायाम केला तर दादांची तब्येत दैनंदिन व्यवहार करण्याइतपत तरी नक्कीच सुधारेल. पण दादा काहीच करत नव्हते. अंथरुणावर पडून माईंना उठ-सूठ हुकूम सोडण्याचा नवा छंद त्यांना जडला होता. माईंचंही वय झालं होतं. दादांचं जड अंग हलवणं, त्यांची स्वच्छता करणं माईंना दिवसेंदिवस अशक्य होऊ लागलं. सरतेशेवटी माईंनी नर्स ठेवली.
    दर महिन्याला घरखर्चासाठी पैसे मागण्याव्यतिरिक्त माईंचा दादांच्या आर्थिक व्यवहाराशी काहीच संबंध आला नव्हता. नर्सचा पगार, महागडी औषधं या सगळ्यांचा मेळ कसा बसवावा हे माईंना समजत नव्हतं. मुलापुढे हात पसरणंही त्यांना मान्य नव्हतं. शेवटी निरुपायाने त्यांनी दादांनाच पैशाबद्दल विचारलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. चैनी आणि उधळ्या स्वभावाचे दादा पूर्णपणे कंगाल झाले असल्याचं नवं दारुण सत्य माईंना कळलं. हळूहळू घरातील एक एक वस्तू माईंनी विकायला काढल्या. नंतर त्यांची जागा दागिन्यांनी घेतली. आलेला सर्व पैसा दादांच्या औषधोपचारातच खर्च होत होता. पण दादांमध्ये कोणतीच सुधारणा नव्हती.
    एक दिवशी दोन्ही मुलांनी आपल्या आईला एका खोलीत बसवलं आणि तासभर तिचे बौद्धिक घेतलं. ङ्गङ्घकशाला झिजवतेस आपला देह या माणसासाठी आई? आयुष्यभर दुःख आणि अवहेलना यांशिवाय काही दिलं नाही त्यांनी तुला. दादांच्या अंताबरोबर तुझ्या सर्व दुःखांचा अंत होईल. तुझे आयुष्य तुझ्या मनाप्रमाणे जग. नको बांधून घेऊस स्वतःला दादांबरोबर.फफ मुलं कळवळ्याने सांगत होती. आणि माई जणू मूकबधिर होऊन बसल्या होत्या.
    ङ्गङ्घअरे बाळांनो, कसं समजावू तुम्हाला. तुमच्या वडिलांसाठी मी तळमळत नाही, मी खंतावते आहे माझ्याचसाठी. आयुष्यभर एका चक्रासारखी भिरभिरते आहे मी आणि गाडीवान होता माझा नवरा. मी बाहेरच्या जगात स्वच्छंदीपणे जगण्याचा विचारही करू शकत नाही. कारण हा विचारही माझ्या थकलेल्या तनामनाला झेपणार नाही. नवर्‍याच्या हुकूमशाही वृक्षाखाली सुकून गेलंय माझ्या मनाचं रोपटं. आता कसल्याही इच्छा आकांक्षा उरल्या नाहीत. उलट भीती वाटतेय न पेलणार्‍या स्वातंत्र्याची. स्वतःच्या मनाने वागायची सवयच उरली नाही मला. बस! पहिलं आणि शेवटचं मागणं मागते दादांपाशी. नका जाऊ माझ्याअगोदर. या जगण्याचीच सवय आहे मला. वेगळ्या प्रकारचं आयुष्य नको आता मला!फफ माईंचं हृदय आक्रंदत होतं.
    टण्! टण्! हॉलमधील घड्याळाचे टोले वातावरणातील भयाण शांतता चिरत माईंच्या कानावर आदळले. माई दचकल्या, कसलीशी अशुभ शंका येऊन त्यांनी दादांकडे पाहिलं.
    दादांची मान डावीकडे कलंडली होती. छातीचा भाता स्तब्ध होता. सलाईनचे एका पाठोपाठ ठिबकणारे थेंब नळीत जमा झाले होते. माई भकास, वटारल्या डोळ्यांनी नवर्‍याकडे एकटक पाहत होत्या.
    आयुष्यभर माईंची वंचना करणारे दादा… मुलांना मागतील त्या वस्तू देताना प्रेमळ पित्याचा भाव आणणारे, पण माईंना मात्र एकेका पैशासाठी रडवणारे दादा… जनतेपुढे कुटुंबवत्सल आदर्श रूपात वावरणारे दादा… इतरांशी बोलताना ज्यांच्या जिभेवर सरस्वती नृत्य करत असे, पण माईंशी बोलताना मात्र शिव्यांचा वर्षाव करणारे दादा… या जगातून निघून गेले होते.
    आयुष्यभर जनतेला, मुलांना आणि बायकोला धोक्यात ठेवणार्‍या दादांनी सरतेशेवटी माईंना न पेलणारा धोका दिला होता. या सावकाश खुर्चीत बसल्या.
    दादांकडे पाहता पाहता माई भूतकाळात कधी शिरल्या, ते त्यांनाही कळलं नाही. लग्नाआधीचे दिवस माईंना आठवले. शिकण्याची केवढी उमेद होती आपल्याला. पण कॉलेजचं शिक्षणही पूर्ण करू दिलं नाही बाबांनी. लग्नाची घाई करणार्‍या वडिलांपुढे बोलण्याची आज्ञा नव्हती. पंधरा वर्षांचं अंतर होतं, माई आणि दादांमध्ये. परंतु, दादांचे उमदे व्यक्तिमत्त्व आणि लहान वयात पित्याचं छत्र हरपलं असतानाही स्वकर्तबगारीवर पुढे आलेल्या दादांचं मंडपात होणारं कौतुक ऐकून माई आपली खंत विसरल्या आणि भावी संसाराची सुखद स्वप्नं रंगवतच बोहल्यावर चढल्या.
    नव्याचे नऊ दिवस हा हा म्हणता सरले. दादांच्या उजळ व्यक्तिमत्त्वाची काळी बाजू माईंना दिसू लागली. एरवी सभ्य, सुसंस्कृत असलेला हा माणूस स्त्रियांच्या बाबतीत मात्र अगदीच सैल होता. लग्न होऊनही दादांनी इतर स्त्रियांशी असलेले संबंध काही तोडले नव्हते. छोट्या छोट्या पुराव्यांनी माईंच्या संशयाला पुष्टी दिली आणि न राहवून एके दिवशी त्यांनी दादांपुढे तोंड उघडलंच.
    ङ्गङ्घतुला व्यवस्थित खायला प्यायला मिळतं आहे ना. मग गुपचूप राहा आणि पुन्हा कधी मला जाब विचारायची हिंमत करू नकोस.फफ एरवी भित्र्या सशागत वावरणारी ही बाई आपल्याला जाब विचारते! हे दादांना सहन झालं नाही म्हणून त्यांनी तिला दम भरला आणि दादांचा हा निर्लज्जपणा पाहून माईंचा तोल सुटला. हाताला लागतील ते चार कपडे बॅगेत कोंबून त्यांनी माहेरची वाट धरली.
    लेक माहेरी परत आलेली पाहताच माईंचे कर्दनकाळ वडील कडाडले, ङ्गङ्घतू परत आलीसच कशी? परत फिर आल्या पावली. गुण्यागोविंदाने संसार करशील, तर चार दिवसांच्या माहेरपणासाठी फक्त उघडे आहेत या घराचे दार तुला. पुरुषाने नाही छंद करायचे, तर कोणी करायचे! बाकी तर काही कमी करत नाही ना तुला? नांदता येत असेल तर नांद, नाही तर मर. पण माझ्या घरात तुला जागा नाही!फफ
    माईंनी अगतिकतेनं स्वतःच्या आईकडे पाहिलं. पण ती दुबळी बाई मान खाली घालून अश्रू ढाळत राहिली.
    जीव द्यायची हिंमत नसलेल्या माई मुकाट नवर्‍याघरी परतल्या. आता दादांची हिंमत अधिकच वाढली. जणू काही माईंवर सूड घेतल्याप्रमाणे ते बाजारी बायकांना घेऊन घरी येत आणि माईंसमोर प्रणयाचे खेळ खेळत. माईंना मेल्याहून मेल्यासारखं होई. परंतु, अपुरं शिक्षण घेतलेल्या भित्र्या माईंमध्ये घराबाहेर पडण्याचं धैर्य उरलं नव्हतं. बाहेर सार्वजनिक ठिकाणी दादा माईंना समारंभांना घेऊन जात. पण मालकिणीची वस्त्रे ल्यायलेल्या माईंना समारंभात पत्नीचा मान मिरवताना, राहून राहून, घरात मात्र आपली जागा पाय पुसण्याची आहे, याची जाणीव बोचत असे.
    शेवटी विधात्यालाच दया आली आणि दोन-दोन वर्षांच्या अंतराने माईंना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. माईंच्या वैराण आयुष्यात नंदनवन फुलवणारी ही छोटुकली-धिटुकली आई… आई म्हणत आपल्या बोबड्या बोलांनी माईंना रिझवू लागली. बघता बघता या दोन चिमण्या जिवांनी माईंचं अवघं विश्‍व व्यापून टाकलं. आपल्या मुलांचे हट्ट पुरवताना, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देताना माईंना वेळ पुरेनासा झाला. त्यांनी आपल्या चिमुकल्या जगातून दादांना हद्दपार करून टाकलं. मुलं मोठी होऊ लागल्याने दादांनी घरात थेर करणं बंद केलं, परंतु बाहेर त्यांची प्रकरणं चालूच होती. आपल्या वडिलांचे प्रताप मुलांच्याही कानावर येत होते, परंतु दादांपुढे बोलण्याची कोणाचीही छाती नव्हती.
    काही वर्षांनी मुलीचं लग्न झालं. मुलाचं शिक्षण पूर्ण होऊन तोही मार्गी लागला, पण दादा मात्र होते तसेच राहिले. अजूनही ते
    पावलोपावली माईंचा अपमान करत आणि माई खाली मानेनं सर्व सहन करीत. स्वैराचारी दादांच्या लाथा खात मनोमन खंतावणारी आपली आई मुलाला बघवेना. एक दिवस संताप असह्य होऊन त्याने दादांना जाब विचारला.
    ङ्गङ्घमाझ्या घरात मी वाटेल तसं वागेन. तुला मान्य नसेल, तर चालता हो!फफ दादा ओरडले.
    मुलाने नेसत्या वस्त्रानिशी घर सोडलं. वारंवार विनवणी करूनही माईंनी मात्र त्याच्याबरोबर जाणं नाकारलं.
    ङ्गङ्घतुला तुझा संसार आहे. तू सुखी राहिलास की मी भरून पावले. तुझ्या संसारात आता माझी अडगळ नकोफफ, माईंनी निक्षून सांगितलं.
    दिवस चालले होते आणि एका निराळ्याच संकटाची चाहूल घेऊन एक दिवस उजाडला. दादांना अचानक पक्षाघाताचा तीव्र झटका आला. उजव्या अंगावरून वारे गेल्यामुळे दादांनी अंथरूण पकडलं आणि माईंच्या कष्टांना परिसीमा उरली नाही. डॉक्टरांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की, रोज नियमित व्यायाम केला तर दादांची तब्येत दैनंदिन व्यवहार करण्याइतपत तरी नक्कीच सुधारेल. पण दादा काहीच करत नव्हते. अंथरुणावर पडून माईंना उठ-सूठ हुकूम सोडण्याचा नवा छंद त्यांना जडला होता. माईंचंही वय झालं होतं. दादांचं जड अंग हलवणं, त्यांची स्वच्छता करणं माईंना दिवसेंदिवस अशक्य होऊ लागलं. सरतेशेवटी माईंनी नर्स ठेवली.
    दर महिन्याला घरखर्चासाठी पैसे मागण्याव्यतिरिक्त माईंचा दादांच्या आर्थिक व्यवहाराशी काहीच संबंध आला नव्हता. नर्सचा पगार, महागडी औषधं या सगळ्यांचा मेळ कसा बसवावा हे माईंना समजत नव्हतं. मुलापुढे हात पसरणंही त्यांना मान्य नव्हतं. शेवटी निरुपायाने त्यांनी दादांनाच पैशाबद्दल विचारलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. चैनी आणि उधळ्या स्वभावाचे दादा पूर्णपणे कंगाल झाले असल्याचं नवं दारुण सत्य माईंना कळलं. हळूहळू घरातील एक एक वस्तू माईंनी विकायला काढल्या. नंतर त्यांची जागा दागिन्यांनी घेतली. आलेला सर्व पैसा दादांच्या औषधोपचारातच खर्च होत होता. पण दादांमध्ये कोणतीच सुधारणा नव्हती.
    एक दिवशी दोन्ही मुलांनी आपल्या आईला एका खोलीत बसवलं आणि तासभर तिचे बौद्धिक घेतलं. ङ्गङ्घकशाला झिजवतेस आपला देह या माणसासाठी आई? आयुष्यभर दुःख आणि अवहेलना यांशिवाय काही दिलं नाही त्यांनी तुला. दादांच्या अंताबरोबर तुझ्या सर्व दुःखांचा अंत होईल. तुझे आयुष्य तुझ्या मनाप्रमाणे जग. नको बांधून घेऊस स्वतःला दादांबरोबर.फफ मुलं कळवळ्याने सांगत होती. आणि माई जणू मूकबधिर होऊन बसल्या होत्या.
    ङ्गङ्घअरे बाळांनो, कसं समजावू तुम्हाला. तुमच्या वडिलांसाठी मी तळमळत नाही, मी खंतावते आहे माझ्याचसाठी. आयुष्यभर एका चक्रासारखी भिरभिरते आहे मी आणि गाडीवान होता माझा नवरा. मी बाहेरच्या जगात स्वच्छंदीपणे जगण्याचा विचारही करू शकत नाही. कारण हा विचारही माझ्या थकलेल्या तनामनाला झेपणार नाही. नवर्‍याच्या हुकूमशाही वृक्षाखाली सुकून गेलंय माझ्या मनाचं रोपटं. आता कसल्याही इच्छा आकांक्षा उरल्या नाहीत. उलट भीती वाटतेय न पेलणार्‍या स्वातंत्र्याची. स्वतःच्या मनाने वागायची सवयच उरली नाही मला. बस! पहिलं आणि शेवटचं मागणं मागते दादांपाशी. नका जाऊ माझ्याअगोदर. या जगण्याचीच सवय आहे मला. वेगळ्या प्रकारचं आयुष्य नको आता मला!फफ माईंचं हृदय आक्रंदत होतं.
    टण्! टण्! हॉलमधील घड्याळाचे टोले वातावरणातील भयाण शांतता चिरत माईंच्या कानावर आदळले. माई दचकल्या, कसलीशी अशुभ शंका येऊन त्यांनी दादांकडे पाहिलं.
    दादांची मान डावीकडे कलंडली होती. छातीचा भाता स्तब्ध होता. सलाईनचे एका पाठोपाठ ठिबकणारे थेंब नळीत जमा झाले होते. माई भकास, वटारल्या डोळ्यांनी नवर्‍याकडे एकटक पाहत होत्या.
    आयुष्यभर माईंची वंचना करणारे दादा… मुलांना मागतील त्या वस्तू देताना प्रेमळ पित्याचा भाव आणणारे, पण माईंना मात्र एकेका पैशासाठी रडवणारे दादा… जनतेपुढे कुटुंबवत्सल आदर्श रूपात वावरणारे दादा… इतरांशी बोलताना ज्यांच्या जिभेवर सरस्वती नृत्य करत असे, पण माईंशी बोलताना मात्र शिव्यांचा वर्षाव करणारे दादा… या जगातून निघून गेले होते.
    आयुष्यभर जनतेला, मुलांना आणि बायकोला धोक्यात ठेवणार्‍या दादांनी सरतेशेवटी माईंना न पेलणारा धोका दिला होता.

Share this article