कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन काल थिएटरमध्ये रिलीज झाला. या सिनेमात मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेची महत्वाची भूमिका आहे. त्यातबाबत अभिनेत्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली.
त्यात त्याने लिहिले की, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चंदू चॅम्पियनमध्ये मुरलीकांत जी पेठकर यांच्या उत्तम कथेत इन्स्पेक्टर सचिन कांबळेची भूमिका साकारण्याचा मोठा सन्मान… जेव्हा @kabirkhankk भाईंनी मला ही कथा सांगितली, तेव्हा मला आश्चर्य वाटले (आणि थोडी लाज वाटली) कारण आपल्या महाराष्ट्रातले अनेकजण आपल्याच या हिरोला ओळखत नाही. या सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून काम करण्यासाठी नाही म्हणण्याचा माझ्याकडे मार्गच नव्हता .. मला कांबळे बनवल्याबद्दल आणि त्याला शोधण्याचे स्वातंत्र्य दिल्याबद्दल कबीर भाई धन्यवाद.
या भूमिकेसाठी माझा विचार केल्याबद्दल @castingchhabra चेही धन्यवाद. कधी कधी मला आश्चर्य वाटतं की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार केला असात? पण तू खूप मस्त आहेस आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे.
@kartikaaryan, तू खरा चॅम्पियन आहेस आणि सिनेमात चंदू उत्तम साकारल्याबद्दल तुझे खूप अभिनंदन. बायोपिक कठीण असू शकतात... आणि याने तुझ्या मर्यादांची चाचणी घेतली पण तू दाखवून दिले की तू खूप लढाऊ आहेस जो कधीही शरण जाणार नाही. यासह तुला आणखी अनेक ब्लॉकबस्टरसाठी शुभेच्छा.
चंदू चॅम्पियन आता थिएटरमध्ये आहे रसिक लोक!
बघायला विसरु नका....