Close

वेगळे होऊन २ वर्ष झाली, तरी मुलीसाठी भाभीजी घर पर है फेम शुभांगी अत्रेने घेतला नाही घटस्फोट (Shubhangi Atre From Bhabhiji Ghar Par Hai fame Dosent Take divorce for her daughter)

'भाभी जी घर पर हैं'मध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी शुभांगी अत्रे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिला आणि तिचा पती पियुष पुरे वेगळे होऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र आतापर्यंत या अभिनेत्रीने आपल्या मुलीला या सगळ्यापासून दूर ठेवले होते. तसेच मुलीमुळेच तिने वेगळे होण्याचा कायदेशीर मार्ग स्वीकारलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्रीने अद्याप घटस्फोट घेतलेला नाही.

शुभांगी अत्रे यांनी 2003 मध्ये इंदूरमध्ये डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्या पियुषसोबत लग्न केले. दोन वर्षांनी तिने एका मुलीला जन्म दिला. पण गेल्या वर्षी हे दोघे जवळपास वर्षभर एकत्र राहत नसल्याची बातमी आली होती. आता या जोडप्याने त्यांच्या लग्नाला आणखी एक संधी दिल्याचेही सांगण्यात येते. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. दोघेही यापुढे एकत्र राहू शकणार नाहीत असा करार झाला.

Shubhangi Atre

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री वेगळी राहत आहे परंतु घटस्फोटाची प्रक्रिया करु इच्छित नाही. 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, शुभांगी आणि पियुष वेगळे झाले आहेत. आपापल्या आयुष्यात पुढेही गेले आहेत. पण जेव्हा कायदेशीर औपचारिकता येते तेव्हा ते मागे हटतात. कारण त्यांना आपल्या मुलीला या सगळ्या संकटात आणायचे नाही.

शुभांगी अत्रेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने 'कसौटी जिंदगी की', 'कस्तुरी', 'चिडिया घर' सारखे शो केले आहेत. आता ती 'भाभी जी घर पर हैं' मध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारून सर्वांचे मनोरंजन करत आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत नाही. फक्त प्रोफेशनल लाईफवर लक्ष केंद्रित संवाद साधते.

Share this article