कलाकारांची मांदियाळी , रेड कार्पेट वर असलेला कलाकारांचा अनोखा सोहळा आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मोठ्या दिमाखात नुकताच पार पडला. विवध पुरस्कार आणि अनेक कलाकारांचा गौरव यात करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील हजेरी लावली होती.
यंदा या पुरस्कारांची खासियत होती ती म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके मामा म्हणजे दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना " महाराष्ट्र भूषण पुरस्काराने " सन्मानित करण्यात आलं या सोहळ्यासाठी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कामासाठी त्यांचा अनोखा सन्मान इथे करण्यात आला. अशोक मामाना या खास क्षणी एक गोड सरप्राइज देखील मिळालं ते म्हणजे अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्या परफॉर्मन्स ने ! या दोघांनी दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्या साठी त्यांच्या चित्रपटातील गाण्यावर एक अफलातून परफॉर्मन्स देखील केला.
शुभंकर आणि संस्कृती यांनी अशोक मामांच्या काही आयकॉनिक गाण्यावर नृत्य सादर करून त्यांचा हा खास क्षण अजून जास्त अविस्मरणीय केला. " अश्विनी आणि प्रियतमा " या त्यांच्या सुप्रसिद्ध गाण्यावर शुभंकर आणि संस्कृती यांनी दमदार परफॉर्मन्स दिला.
या दोघांच्या खास परफॉर्मन्स ने प्रेक्षकांची मन तर जिंकली पण अशोक मामा ना त्यांच्या जुन्या आठवणी देखील या निमित्ताने उजाळा मिळाला. शुभंकर आणि संस्कृती यांच्या या खास परॉर्मन्सने ही रात्र अजून अविस्मरणीय केली.