Close

लवकरच श्वेता तिवारी दिसणार एका हिंदी विनोदी नाटकामध्ये ‘एक मैं और एक टू’ (Shweta Tiwari Announces Good News Of Hindi Comedy Drama ‘Ek Main Aur Ek Two’)

अभिनेत्री श्वेता तिवारी कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील श्वेताचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील श्वेता हिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो खुद्द श्वेताने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. शिवाय अभिनेत्रीने एका गोड बातमीची घोषणा केली आहे. ज्यामुळे चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. कायम फॅशनचा जलवा दाखवणाऱ्या श्वेताने चाहत्यांसोबत कोणती आनंदाची बातमी शेअर केली आहे… जाणून घेऊ.

श्वेता तिवारी हिने सोशल मीडियावर एका पोस्ट शेअर केली आहे. फोटो पोस्ट करत श्वेता हिने कॅप्शनमध्ये, ‘बहुप्रतिक्षीत हिंदी कॅमेडी प्ले ‘एक मैं और एक टू’ ची घोषणा करताना आनंद होत आहे. विनोद आणि भावनात्मक गोष्टीच्या रोलरकोस्टरसाठी तयार व्हा..’ असे म्हटले आहे.

पुढे श्वेता म्हणाली, ‘मी अन्य कलाकारांना भेटण्याची आता प्रतीक्षा करू शकत नाही! ते कोण असतील याचा अंदाज कोणी लावू शकतं का?’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सांगायची गोष्ट म्हणजे, श्वेता तिवारी मालिका, चित्रपटानंतर आता हिंदी नाटक करताना दिसणार आहे. ‘एक मैं और एक टू’ असं श्वेताच्या नाटकाचं नाव असून विनोदी कथानका भोवती फिरणारं हे नाटक आहे. या नाटाकाचा प्रीमियर शो ६ जुलै रोजी संध्याकाळी ७.३० वाजता सेंट अँड्र्यूज येथे आणि ७ जुलै रोजी रंगशारदा येथे संध्याकाळी ७ वाजता होईल. श्वेताने या नाटकाचे पोस्टर शेअर केले आहे.

श्वेता तिवारी हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेमुळे श्वेता हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

आज श्वेता तिवारीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर देखील श्वेता कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील श्वेता हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी श्वेता कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. श्वेताला तिच्या नवीन नाटकासाठी अनेक शुभेच्छा!

Share this article