टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीचे वैयक्तिक आयुष्य फारसे चांगले नव्हते. श्वेताने दोनदा लग्न केले, पण दोन्ही अयशस्वी ठरले. श्वेताला तिच्या वैयक्तिक आयुष्यात फारसा आनंद मिळाला नसेल, पण प्रेक्षकांनी तिला भरभरून प्रेम दिले. श्वेता नेहमीच प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री राहिली आहे. सौंदर्याबद्दल बोलायचे झाले तर वयाची ४० ओलांडल्यानंतरही श्वेता तरुण अभिनेत्रींना मागे टाकते.
आता श्वेताची मुलगी पलक तिवारीनेही अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला आहे. आई आणि मुलीची केमिस्ट्री इतकी चांगली आहे की दोघेही मैत्रीणीसारख्या वाटतात. सोशल मीडियावर चाहत्यांना श्वेता आणि पलकची बॉन्डिंग आवडते. या दोघांच्या फोटोंवर चाहते उघडपणे प्रेमाचा वर्षाव करतात.
श्वेता तिवारीचा पहिला पती राजा चौधरी आपल्या पत्नीबद्दल अनेकदा विधाने करतो. पुन्हा एकदा राजा चौधरी यांचे श्वेता तिवारीसंदर्भातील वक्तव्य चर्चेत आहे. राजा चौधरी यांनी श्वेता तिवारीसाठी म्हटले आहे की, श्वेताने सर्व संपत्ती घेतली आणि मला जगासमोर राक्षस बनवले.
एका मुलाखतीत, राजा चौधरीने सांगितले की तो एका कॉमन फ्रेंडद्वारे श्वेताला भेटला. श्वेता तिवारीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता, तरीही दोघांनी लग्न केले. लवकरच दोघेही पलकचे पालक झाले. लग्नानंतर आणि मुलीच्या जन्मानंतरही श्वेताचे करिअर चांगलेच चालले होते.
राजाने आपल्या मुलाखतीत सांगितले की, श्वेता जेव्हा 'कसौटी जिंदगी की' शो करत होती, तेव्हा तिच्या आजूबाजूला अनेक लोक होते जे तिला भडकवत होते. श्वेताला माझ्यासोबत राहण्याची गरज काय, असा सल्ला दिला जात होता. राजाने सांगितले की, श्वेता तिच्या करिअरमध्ये इतकी व्यस्त झाली होती की तिच्याकडे तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी वेळच नव्हता. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा वाढू लागला.
श्वेताने आपल्यावर मारहाणीचे खोटे आरोप केल्याचेही राजा म्हणाला. यामुळे श्वेताची प्रतिमा चांगली राहिली, पण मी खलनायक बनलो.तिने मला जगासमोर राक्षस बनवले. राजाने सांगितले की, श्वेताने सर्व मालमत्ता स्वतःकडे ठेवली होती. माझ्याकडे फक्त एकच फ्लॅट उरला होता.
या मुलाखतीत राजाने आपली मुलगी पलकचाही उल्लेख केला होता. राजा म्हणाला की, आमच्या नात्याचा माझ्या मुलीसोबतच्या बॉन्डिंगवरही परिणाम झाला. पूर्वी पलक माझ्यापासून अंतर ठेवायची, पण आता आमचे संबंध सुधारले आहेत. पलक आता तिचे वडील राजा चौधरी यांनाही इन्स्टाग्रामवर फॉलो करते.
श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांचे 1998 मध्ये लग्न झाले आणि 9 वर्षांनी घटस्फोट झाला. लग्नाच्या 9 वर्षानंतर दोघेही वेगळे झाले.