Close

२३वर्षांनंतर येतोय अनिल कपूरच्या ‘नायक’चा सीक्वल (Siddharth Anand, Milan Luthria Come Together For Sequel Of Anil Kapoor Film Nayak 2)

सिद्धार्थ आनंद यांच्या ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खानने बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक केलं. या चित्रपटाने तब्बल ६०० कोटींहून अधिक कमाई केली. या सुपरहीट चित्रपटानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हृतिक रोशन आणि दीपिका पदूकोणचा ‘फायटर’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आले अन् या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता सिद्धार्थ आनंद एका लोकप्रिय हिंदी चित्रपटाचा सीक्वल करणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

एस. शंकर यांचा ‘नायक’ हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनिल कपूरने रिपोर्टरची भूमिका केली होती. शिवाजी राव हे त्यांचे नाव. शिवाजी मुख्यमंत्र्यांना खडतर प्रश्न विचारतो आणि त्या बदल्यात त्याला एक दिवसासाठी मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते. पुढे तो एका दिवसात संपूर्ण व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करतो. आता तब्बल २३ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

सिद्धार्थ आनंद आणि ममता आनंद यांच्या मार्फिक्स पिक्चर्सच्या बॅनरखाली 'नायक २' चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे आहेत. तर मिलन लुथरिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. 'नायक २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याची घोषणा करण्यात आली आहे.

पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आनंद आणि ममता आनंद यांच्या मार्फिक्स पिक्चर्सच्या बॅनरखाली 'नायक २' चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे आहेत. तर मिलन लुथरिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. हा चित्रपट देखील राजकारणावर आधारित असणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठीची जागा देखील फायनल झाली आहे. पण अद्याप चित्रपटामधील कलाकारांची कास्टिंग सुरू आहे. या चित्रपटामध्ये नेमके कोण-कोणते कलाकार काम करणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मिनल लुथरियाने याआधी 'द डर्टी पिक्चर', 'कच्चे धागे', 'टॅक्सी नंबर 9211' आणि 'वन्स अपॉन ए टाइम' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. दरम्यान, 'नायक: द रियल हिरो' हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. रजनीकांतच्या 'शिवाजी: द बॉस'सारखे हिट चित्रपट बनवणाऱ्या एस शंकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर एएम रत्नम हे या चित्रपटाचे निर्माता होते. त्यांनी श्री सूर्या मुव्हीजच्या बॅनरखाली त्याची निर्मिती केली होती. या चित्रपटामध्ये अनिल कपूर, राणी मुखर्जी, अमरीश पुरी, परेश रावल, जॉनी लीव्हर आणि शिवाजी साटम हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत होते.

Share this article