तापसी पन्नूने गुपचूप लग्न केल्याच्या बातम्यांनंतर आता आणखी एका फिल्मी जोडप्याच्या लग्नाची चर्चा आहे. बॉलिवूड स्टार्स सिद्धार्थ आणि आदिती राव हैदरी यांनी गुपचूप लग्न केल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे लग्न श्री रंगनायकस्वामी मंदिरात झाले. आता चाहते दोघांच्या लग्नाच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सिद्धार्थ आणि आदिती खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आले आहे. रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की, आज 27 मार्च रोजी दोघांनी तेलंगणा मंदिरात लग्न केले.
आदिती किंवा सिद्धार्थ या दोघांनीही कधीच त्यांच्या नात्याची पुष्टी केलेली नाही. घाईगडबडीत हे गुपचूप लग्न झाल्याचे बोलले जात आहे. असे म्हटले जात आहे की आता दोघांनी लग्नगाठ बांधली आहे, सोशल मीडियावर चाहते त्यांच्या लग्नाच्या फोटोची वाट पाहत आहेत.
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू तमिळ चित्रपट 'महा समुद्रम'मध्ये आदिती आणि सिद्धार्थने एकत्र काम केले होते. आदिती आणि सिद्धार्थ अनेक चित्रपट कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. एवढेच नाही तर दोघेही सुट्टीसाठी एकत्र फिरताना आढळले आहेत. दोघेही अनेक सोशल मीडिया रिल्समध्ये एकत्र दिसले आहेत. या जोडप्याकडे त्यांच्या चाहत्यांचे नेहमीच लक्ष असते
अदितीचे पहिले लग्न 2009 मध्ये सत्यदीप मिश्रासोबत झाले होते आणि त्यानंतर 2013 मध्ये दोघे वेगळे झाले. सिद्धार्थचेही हे दुसरे लग्न असेल. सिद्धार्थचे पहिले लग्न 2003 मध्ये झाले आणि 2007 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.