राम गोपाल वर्मा यांनी २६ डिसेंबरला ऑनलाइन तक्रार केली होती. त्यानंतर २७ डिसेंबरला विजयवाडा येथील पोलीस महासंचालक कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते कोलिकपुडी श्रीनिवास यांच्याविरोधात रितसर लेखी तक्रार दाखल केली.
राम गोपाल वर्मांच्या 'व्यूहम' चित्रपटामुळे सामाजिक कार्यक्रत्याच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे त्यांनी दिग्दर्शकचा शिरच्छेद करणाऱ्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. कोलिकपुडी श्रीनिवासने TV5 ला दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट म्हटली होती. सूत्रसंचालकाने त्यांना आपले शब्द मागे घेण्यास सांगितले तेव्हाही त्या कार्यकर्त्याने नकार दिला आणि आपल्यासाठी समाजापेक्षा कोणीही मोठा नाही असे सांगितले.
राम गोपाल वर्मा यांनी हा व्हिडिओ X वर शेअर करुन आपण कोलिकपुडी श्रीनिवास विरोधात पोलिस तक्रार दाखल करत असल्याचे सांगितले. राम गोपाल वर्मा यांनी टीव्ही ५ सूत्रसंचालक सांबाशिवा राव आणि मालक बीआर नायडू यांच्याविरोधातही तक्रार दाखल केली आहे.
व्हिडिओमध्ये कोलिकपुडी श्रीनिवास हे असेही म्हणत आहेत की, जर राम गोपाल वर्माने अल्पसंख्याक समुदायावर असे चित्रपट बनवले तर त्यांना त्यांच्याच घरात जाळून मारण्यात येईल.
अलीकडेच त्यांच्या हैदराबाद येथील कार्यालयाबाहेर अनेकांनी निदर्शने करून दिग्दर्शकाचा पुतळाही जाळला. राम गोपाल वर्मांच्या 'व्यूहम' या चित्रपटाला विरोध होत आहे. राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या 'व्यूहम' चित्रपटात आंध्र प्रदेशचे राजकारण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट अनेक राजकीय पक्षांना खटकत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांच्या मृत्यूच्या वेळी घडलेल्या घटनाही या चित्रपटात दाखवण्यात आल्या असल्याने वातावरण तापले आहे.
फोटो सौजन्य- सोशल मीडिया