Close

सोनम कपूरचा नवरा होता गंभीर आजाराने त्रस्त, गतवर्षीच्या आठवणी अभिनेत्रीने केल्या शेअर (Sonam Kapoor husband Anand Ahuja was suffering from a serious illness, the actress shared her memories of last year 2023)

सोशल मीडियावर अभिनेत्री सोनम कपूरची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. २०२४ च्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे. मात्र त्यात तिने २०२३ मध्ये आलेल्या वाईट अनुभवांवरही भाष्य केले आहे.

सोनमने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'गेले वर्ष चढ-उतारांनी भरलेले होते. आम्ही आता पालक झालो आहोत हे सत्य स्वीकारले आहे. आई होण्याने भरपूर आनंद तर मिळतोच, पण अनेक अज्ञात भीतींनाही या काळात सामोरे जावे लागते.

मी भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप बदलले आहे. घडणऱ्या गोष्टी समजून घेणे आणि स्वीकारणे हा प्रवास चालू आहे. हा माझ्यासाठी पूर्णपणे नवीन अनुभव होता.

सोनमने पुढे लिहिले की, माझा पती खूप आजारी पडला होता. त्याला नक्की काय झाले हे डॉक्टरांनाही समजत नव्हते. ते तीन महिने माझ्यासाठी नरका समान होते, पण देवाच्या कृपेने आणि डॉ. सरीन यांच्या मेहनतीने चांगले फळ मिळाले. आनंद आता पूर्णपणे बरा आहे. 'मी माझ्या पतीला त्यांच्या व्यवसायात मदत करण्यास सक्षम आहे. त्याचा व्यवसायही खूप वाढत आहे. माझ्या मौल्यवान कुटुंबासह आणि जवळच्या मित्रांसह वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असताना हे एक कठीण, मजेदार आणि परिपूर्ण वर्ष गेले.

सोनमने पुढे लिहिले, 'मला आशा आहे की एक दिवस हे जग समजून घेईल की युद्धाने काहीही साध्य होणार नाही. या युद्धात ज्यांनी आपले जवळचे गमावले त्यांच्यासाठी मी प्रार्थना करते. देव त्यांना बळ देओ. तसेच 'जे लोक सत्तेत आहेत, ज्यांच्याकडे सत्ता आहे, ते राक्षसासारखे वागत आहेत.' 'नवीन वर्ष सर्वांसाठी मंगलमय जावो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांसाठी प्रेम.

Share this article