'सूरज हुआ मद्धम', 'जिंदगी मौत ना बन जाए', 'मुझे रात दिन', 'ये दिल', 'कल हो ना हो', 'तुमसे मिल के दिल का', 'भगवान है कहाँ रे तू' यांसारखी सुपरहिट गाणी गाऊन लोकांच्या हृदयावर राज्य करणारा सोनू निगम हा देशातील प्रतिभावान गायकांपैकी एक आहे आणि लाखो लोकांसाठी प्रेरणा देखील आहे. तो केवळ गायकच नाही, तर त्याची देवावर गाढ श्रद्धा आहे आणि त्याने आपल्या मुलाखतींमध्ये अनेकदा याचा उल्लेख केला आहे. आता सोनू निगमने त्याच्या घरातील मंदिराची झलक शेअर केली आहे. जे पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय? असं नक्कीच तुम्हाला वाटत असणार…
तर सोनू निगमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांची मुलगी तिशा निगमने टिपला आहे. या व्हिडिओमध्ये सोनू निगम धोतर परिधान करून मंदिरात प्रवेश करताना दिसत आहे. मंदिरात जाताच तो सर्वात पहिले काम करतो तो म्हणजे त्याच्या आईची पूजा. त्यांच्या फोटोला गंध लावून त्यावर चुनरी घालतो. यानंतर तो मंदिरातील सर्व देवी-देवतांची पूजा करतो. गायकाची ही शैली पाहून चाहते प्रभावित होत आहेत.
पण व्हिडिओची पुढची फ्रेम पाहून चाहते थक्क झाले आहेत. सोनू निगमच्या घरातील मंदिरात देवाच्या मूर्तीबरोबरच चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील मोठ्या दिग्गजांचीही पूजा केली जाते. देवी आणि देवांची पूजा केल्यानंतर सोनू बॉलीवूड म्युझिक इंडस्ट्रीतील गुलशन कुमार, आशा भोसले, मोहम्मद रफी, लता मंगेशकर यांसारख्या दिग्गजांची प्रशंसा करताना दिसत आहे. या सर्वांशिवाय त्यांच्या मंदिरात ओशो आणि मायकल जॅक्सन यांची छायाचित्रे आहेत ज्यावर ते कमेंट करताना दिसत आहेत. सोनू निगमने व्हिडीओमध्ये असेही सांगितले आहे की, तो नवरात्रीच्या काळात अशाप्रकारे पूजा करण्याचा हा रूटीन फॉलो करतो.
हा व्हिडिओ पाहून चाहते आता आश्चर्यचकित झाले आहेत आणि सोनू निगमला कलेचा खरा पुजारी म्हणत आहेत. एका युजरने प्रतिक्रिया देताना असे लिहिले की, "हे आश्चर्यकारक आहे." एकाने लिहिले की, "ओशो आणि मायकल जॅक्सनही त्यांच्या मंदिरात आहेत, ते कलेचे खरे पुजारी आहेत." लोक या व्हिडिओला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट व्हिडिओ म्हणत आहेत आणि हा व्हिडिओ कॅप्चर केल्याबद्दल तिशा निगमचे आभारही मानत आहेत. तिशा निगम ही सोनू निगमची बहीण आहे, पण सोनू तिला मुलीप्रमाणे वागवतो आणि सोशल मीडियावरही तिला मुलगी म्हणून संबोधतो.