समाजसेवक परोपकारी सोनू सूदने अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया वर हँडलवर एका चाहत्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत एक खास गोष्ट शेयर केली. या सगळ्या कृत्याने सोनू अगदीच भावूक झाला आणि त्याने हा सगळा किस्सा सोशल मीडिया वर शेयर केला आहे. चाहत्याने त्याचा साठी लिहिलेल्या खास चिठ्ठी चा स्नॅपशॉट शेअर करून त्याला कॅप्शन दिले
"हे कोणी केले हे मला माहीत नाही पण एका रेस्टॉरंटमध्ये आमच्या रात्रीच्या जेवणाचे संपूर्ण बिल कोणीतरी दिले आणि ही गोड चिठ्ठी सोडली. या कृत्याने अगदीच मी भावूक झालो आहे. ❤ धन्यवाद मित्रा❤🙏"
https://x.com/sonusood/status/1760685513634463773?s=46
सोनू सूदला त्याच्या चाहत्यांकडून सतत पाठिंबा मिळत असतो. चाहते सोनू साठी कायम काही न काहीतरी करत असतात आणि अश्यातच ही गोष्ट सोनूच्या मनाला भावून गेली. इंडियन क्रिएटिव्ह युनिटी ने अजितवाल मोगा येथे 1.17 लाख चौरस फुटांवर सोनू साठी एक उल्लेखनीय पॉप आर्ट मास्टरपीस केला होता याव्यतिरिक्त एका समर्थकाने देशभरातील चाहत्यांमध्ये एकता आणि दयाळूपणा वाढवण्यासाठी "मैं भी सोनू सूद मोहीम" सुरू केली. सोनू सूदच्या मानवतावादी उपक्रमांचा भारतातील लोकांवर आणि चाहत्यांवर कसा मोठा प्रभाव पडला आहे हे कायम दिसून येत.
वर्क फ्रंटवर झी स्टुडिओज आणि सूदची निर्मिती कंपनी शक्ती सागर प्रॉडक्शन सह-निर्मित असलेल्या सायबर क्राइम थ्रिलर 'फतेह'मध्ये सोनू रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटात सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत.