Close

अंबानींच्या कार्यक्रमांना सेलिब्रेटींचा खास पाहुणचार, उभारले पंचताराकिंत तंबू (Special hospitality For celebrities at Ambani’s events, five-star tent set up)

भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या प्री वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे. त्यासाठी देशाविदेशातून पाहुणे जामनगरला पोहचले आहेत. बॉलिवूडकर देखील तिथे पोहचले आहेत. सध्या हा शाही कार्यक्रम सर्वांच्या चर्चेत आहे. तेथील फोटो सघ्या व्हायरल होत आहेत.

जामनगरमध्ये पंचतारांकित हॉटेल नाहीत. त्यामुळे कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांची गैरसोय होऊ नये यासाठी उत्तम सुविधा असलेली आलिशान तंबू बांधण्यात आले आहेत. अनंत अंबानी यावर्षी एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची धाकटी मुलगी राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहे.

या पंचतारांकित तंबूची झलक सायना नेहवालने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली.

हे प्रीवेडिंग फंक्शन ३ दिवसांचे आहे. पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात पाहुण्यांनी त्यांच्या आवडीचे कॉकटेल पार्टी थीम पोशाख परिधान केले होते. दुसऱ्या दिवशी, ‘अ वॉक ऑन द वाइल्डसाइड’ आयोजित केला जाईल, ज्याची ड्रेस थीम ‘जंगल फीवर’ असेल. हे अंबानी कुटुंबाचे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र वंटारा येथे आयोजित केले जात आहे.

यानंतर पाहुणे ‘मेला रुज’साठी रवाना होतील. त्यावेळी पाहुणे त्यांच्या आवडत्या दक्षिण आशियाई पद्धतीचे पोशाख घालतील. तिसऱ्या दिवशी दोन कार्यक्रम आहेत. पहिला टस्कर ट्रेल्स असेल ज्यामध्ये सर्व पाहुण्यांना जामनगरचे नैसर्गिक सौंदर्य दाखवले जाईल. दुसरा कार्यक्रम ‘सिग्नेचर’चा आहे. हा शेवटचा कार्यक्रम असेल ज्यात पाहुणे 'हेरिटेज इंडियन ड्रेस' परिधान करणार आहेत.

Share this article