बॉलिवूड चित्रपटांचे निर्माते टिप्स फिल्मस्ने तयार केलेला पहिला मराठी चित्रपट ‘श्रीदेवी प्रसन्न’ प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला यश मिळावे त्यासाठी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी चित्रपटाची सर्व टिम मुंबईच्या श्री सिद्धी विनायक मंदिरात गेली होती. सर्व कलावंत-तंत्रज्ञांनी बाप्पाची विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतले.
या चित्रपटाचे निर्माते कुमार तौरानी असून दिग्दर्शन विशाल विमल मोढवे आहेत. सई ताम्हणकर व सिद्धार्थ चांदेकर ही जोडी त्यात असून सोबत रसिका सुनील, सुलभा आर्य, शुभांगी गोखले, समीर खांडेकर व संजय मोने हे आहेत. या रोमॅन्टिक कॉमेडीचे लेखन अदिती मोघे यांनी केले आहे. सिनेमावेड्या फॅमिलीज ही या चित्रपटाची थीम आहे. म्हणून काही लोकप्रिय हिंदी गाणी या चित्रपटाचा भाग बनली आहेत.