टीव्ही अभिनेत्री कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि डॉ. संकेत भोसले यांच्या यांच्या घरात पाळणा हलला आहे. या जोडप्याने आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. सुगंधा मिश्रा आणि डॉ. संकेत भोसले एका गोंडस मुलीचे पालक झाले आहेत. कॉमेडियनचे पती डॉ. संकेत भोसलेने हॉस्पिटलमधील आपल्या बाळाचा फोटो शेअर करून ही गोड बातमी सोशल मीडियावर दिली आहे.
गोंडस मुलीचा बाप झाल्यानंतर डॉ. संकेत भोसलेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करून डॉ. संकेतने आपल्या प्रियजनांसोबत आणि मित्रांसह संपूर्ण जगाला आनंदाची बातमी दिली आहे की आता तो एका परीचा बाप झाला आहे.
डॉ. संकेत सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये बाबा बनल्याचे सांगतांना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, त्याने पत्नी सुगंधा आणि बाळाची झलक देखील दर्शविली आहे, परंतु इमोजीने लहान मुलीचा चेहरा झाकला आहे. मुलगी झाल्याचा आनंद या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
व्हिडिओ शेअर करताना डॉ. संकेतने कॅप्शन लिहिले - ब्रह्मांडाने आम्हाला एका अतिशय सुंदर चमत्काराच्या रूपात आशीर्वाद दिला आहे... आमच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून, आम्हाला एक सुंदर मुलगी झाली आहे.
कृपया असेच आपल्या प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करत राहा. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सेलिब्रिटींसह त्यांचे चाहतेही त्यांना मुलीच्या जन्माबद्दल शुभेच्छा देत आहेत.