Close

सुनील शेट्टी यांच्या ‘या’ वक्तव्यामुळे अथियाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण (Suniel Shetty Daughter Athia Shetty And Kl Rahul Expecting Their First Child Video Viral On Social Media)

सुनिल शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी आणि तिचा क्रिकेटर पती केएल राहुल दोघंही लग्नानंतर खूप एन्जॉय करत आहेत. चार वर्षांच्या डेटिंगनंतर केएल राहुलने २३ जानेवारी २०२३ला अथिया शेट्टीशी लग्न केले. दोघांच्या लग्नाला आता एक वर्ष झालं असून त्यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार असल्याचं म्हटलं जात आहे.  याबाबत थेट अथियाचे वडिल आणि अभिनेते सुनील शेट्टी यांनी एक मोठी अपडेट दिली आहे.

सुनील शेट्टी यांच्या या वक्तव्यामुळे अथियाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे लवकरच शेट्टींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण या सगळ्याची येत्या काळात चाहत्यांना उत्तरं मिळतीलच. त्याचप्रमाणे या सर्व प्रश्नांवर सुनील शेट्टींनी केलेल्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सुनील शेट्टी ‘डांस दीवाने’ रिऍलिटी शोचे जज म्हणून काम करत आहेत. अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील या शोची जज आहे.

दरम्यान, ‘डांस दीवाने’ रिऍलिटी शोमध्ये सुनील शेट्टी यांनी लेक अथिया शेट्टी हिच्याबद्दल असं काही सांगितलं, ज्यामुळे लोकांनी वेगळाच अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यानंतर अथिया देखील चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर करेल का? अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

सांगायचं झालं तर, शोचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये होस्ट भारती सिंह, सुनील शेट्टी आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत बोलताना दिसत आहे. भारती म्हणते, ‘सुनील सर तुमच्या मुलीला बाळ होणार तुम्ही आजोबा होणार…’ यावर सुनील शेट्टी यांनी जे वक्तव्य केलं ज्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सुनील शेट्टी म्हणाले, ‘मी पुढच्या सीझनमध्ये जेव्हा येईल तेव्हा आजोबांप्रमाणे येणार…’ अभिनेत्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र सुनील शेट्टी यांची लेक आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

अथिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सुनील शेट्टी यांची मुलगी असल्यामुळे चर्चेत असते. अथिया हिने ‘हिरो’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर देखील अथिया अनेक सिनेमांमध्ये झळकली. पण तिला झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान निर्माण करता आलं नाही.

अथिया आता अभिनयापासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. दरम्यान सुनील शेट्टीच्या विधानाकडे सर्वांचे लक्ष वेधलं. त्यामुळे अथिया शेट्टी खरच प्रेग्नंट आहे का, असा प्रश्न सध्या लोकांना पडून लागला आहे.  हे नाकारता येत नाही की केएल राहुल आणि अथिया या दोघांना खूपच खासगी आयुष्य जगायला आवडतं. त्यामुळे अथिया जरी प्रेग्नंट असेल तरी त्यांना ही बातमी अजूनही प्रायव्हेटच ठेवायला आवडेल. याशिवाय अथिया मागील काही काळापासून कोणत्याही चित्रपटामध्ये झळकली नाही. त्याचप्रमाणे ती क्वचितच कोणत्यातरी कार्यक्रमात दिसते. त्यामुळे अथिया प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.

Share this article