बरेचसे बॉलिवूड कलाकार हे अभिनयाव्यतिरिक्त इतरही काही बिझनेस करताना दिसतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी, प्रियंका चोप्रा, गायिका आशा भोसले अशा अनेक हिंदी-मराठी सेलिब्रेटींनी हॉटेल व्यवसायामध्ये चांगलाच जम बसविला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्री सनी लिओनीने देखील नवे रेस्टॉरंट सुरु केले आहे.
सनी लिओनीच्या रेस्टॉरंटचे नाव ‘चिका लोका’ असे आहे. २२ जानेवारी रोजी नोएडा येथील गुलशन वन २९ येथे सिंगिंग बाउल हॉस्पिटॅलिटीच्या साहिल बावेजा यांच्या सहकार्याने सनी लिओनीच्या ‘चिका लोका’चे उद्घाटन होणार आहे.
नव्या हॉटेलविषयी बोलताना सनी म्हणाली की, ‘चिका लोका’ हा माझ्यासाठी नवा अनुभव असणार आहे. हॉटेल इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यासाठी मी उत्सुक तर आहेच पण हा नवा प्रवास अनुभवण्याची मी वाट बघत आहे. अभिनयाच्या सोबतीने ग्लॅमर वर्ल्डच्या पलिकडे जाऊन आता हा अनुभव घेणं नक्कीच कमालीचं असणार आहे. लोकांनी यावं अन् इथल्या गोष्टींचा आस्वाद घ्यावा ही आमची इच्छा आहे"
शेफ वैभव भार्गव यांनी तयार केलेले ७,००० स्क्वेअर फूट पसरलेले फ्लॅगशिप आउटलेट भारतीय, आशियाई, मेक्सिकन आणि इटालियन पाककृतींचे मिश्रण आहे. इथे जागतिक फ्लेवर्सची पर्वणी अनुभवता येणार आहे. "पोशन्स बाय सनी लिओनी " हे खास बॉलीवूड कॉकटेल इकडे मिळणार आहे.
सनीचा ‘चिका लोका’ हा हॉटेल इंडस्ट्रीत मधला प्रवास लवकरच सुरू होणार असून स्टेज, बार आणि टेरेससह ही जागा एक नेत्रदीपक ठिकाण आहे यात शंका नाही. गोवा, हैदराबाद आणि मुंबईमध्ये विस्तार करण्याच्या योजनांसह सनीचा हा खास उपक्रम २२ जानेवारी रोजी नोएडा येथील गुलशन वन २९ येथे सुरू होणार आहे.
(Photo Credit : Instagram/@sunnyleone)