बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या शोमध्ये सुरज चव्हाणने विजेत्यापदावर आपले नाव कोरले आहे.
या शोमध्ये निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार हे फायनलिस्ट होते.
जान्हवीने पैसे निवडून आधीच शो सोडला होता. तिने ट्रॉफी ऐवजी ९ लाख रुपये निवडले. त्यानंतर अंकिता वालावलकर व धनंजय पोवार हे सदस्य अनुक्रमे बाहेर पडले.
त्यानंतर टॉप ३ मध्ये निक्की तांबोळी, अभिजीत सावंत व सूरज चव्हाण हे स्पर्धक पोहचले. आलिया भट्टने जिगरा सिनेमाच्या प्रमोशन निमित्त या शोमध्ये उपस्थिती लावली होती. त्यानंतर झालेल्या एलिमिनेशनमध्ये निक्की बाहेर पडले.
अभिजीत सावंत व सूरज चव्हाण हे टॉप २ ठरले. बिग बॉसच्या घरची लाइट बंद करण्याचा मान त्यांना मिळाला.
त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत सूरज चव्हाणचे नाव विजेता म्हणून घोषित करण्यात आले. त्यावेळी त्याला एक स्कुटर, १० लाख रुपयांचा पुना गाडगिळचा चेक व १४ लाखांची प्राइझ मनी मिळाली.