सुष्मिता सेन अनेकदा वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलते. फारुख शेखच्या 'जीना इस का नाम है' या टॉक शोच्या एका एपिसोड तिने तिचा पहिला बॉयफ्रेंड रजत तारा बद्दल सांगितले. शोमध्ये तिने आपल्या पहिल्या बॉयफ्रेंडचे कौतुकही केलेले.
सुष्मिताने सांगितले की रजत तारा तिचा पहिला बॉयफ्रेंड होता, मिस युनिव्हर्सच्या ट्रेनिंगसाठी तिला मुंबईला शिफ्ट व्हावे लागले होते. युनिव्हर्सच्या ट्रेनिंगसाठी रजत अभिनेत्रीसोबत मुंबईत राहिला होता.
मुलाखतीत सुष्मिता म्हणाली, 'मला तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हा माझा प्रियकर रजत आहे. माझ्या आयुष्यातली सर्वात खास व्यक्ती कारण जेव्हा मी मिस इंडिया जिंकली आणि मला मिस युनिव्हर्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईत यावे लागले, तेव्हा मुंबई माझ्यासाठी अगदी परदेशासारखी होती कारण मी दिल्लीत लहानाची मोठी झाले. त्यामुळे मुंबईला जावं लागणार म्हणून मी रडायला लागली. त्यावेळी मी रडत म्हणालेले मला मिस युनिव्हर्स व्हायचे नाही.... हे मी एकटी करु शकत नाही.'
तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडने तिच्यासाठी नोकरी सोडली होती. त्यावेळी रजत बेनेटनसाठी काम करत होता आणि त्याने एक महिन्याची रजा मागितली. पण दुर्दैवाने त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर रजत तिच्यासोबत मुंबईला आला आणि तिच्या ट्रेनिंग दरम्यान तिथेच राहिला.