Close

स्वरा भास्करची मुलगी ७ महिन्यांची झाली, लेकीसोबतच्या गोड क्षणांचा व्हिडिओ केला शेअर (Swara Bhasker Drops Aww Dorable Video Of Daughter Raabiyaa As She Turns 7 Months Pens Sweet Note)

स्वरा भास्करने मुलीला जन्म दिल्यानंतर तिच्या आयुष्याला एक सुंदर वळण मिळाले आहे. सध्या ती मातृत्वाचा पुरेपूर आनंद घेत आहे. स्वराची मुलगी राबिया नुकतेच सात महिन्यांची झाली आहे. अन्‌ राबियासाठी स्वराने गोड टीप लिहिली आहे.

फेब्रुवारी २०२३ मध्ये फहाद अहमदशी लग्न केल्यानंतर, या जोडप्याने त्याच वर्षी २३ सप्टेंबर रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. आता २३ एप्रिल रोजी, त्यांची मुलगी राबिया सात महिन्यांची झाली. यामुळे आई स्वराचा आनंद गगनात मावेनासा झालेला असून तिने राबियाचा एक व्हिडियो सोशल मीडियावर टाकला असून त्यासोबत एक गोड नोटही लिहिली आहे.

स्वरा आपल्या मुलीसोबत अतिशय छान वेळ घालवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये स्वरा आपल्या लेकीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. तिचे चुंबन घेत आहे. छोटी राबीसुद्धा आपल्या आईचे केस पकडून खेचताना दिसत आहे. त्यानंतर ती आईचं नाक पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. तिला तसे करताना लागताच असे करून नकोस असे स्वरा राबीला सांगत आहे.

या व्हिडिओसोबतच स्वराने एक गोड नोटही लिहिली आहे, ज्यात ती म्हणतेय, “आज माझ्या काळजाचा तुकडा सात महिन्यांचा झाला आहे. माझे डोळे अनेकदा शिकार बनले आहेत आणि माझ्या चेहऱ्यावर अनेकदा पंजे मारले गेले आहेत. आता माझी मुलगी आपल्या पंजाचा वापर करण्यास शिकत आहे. #सात महिने”

स्वराने मायलेकींमधील या गोड क्षणाचा एक फोटो देखील शेअर केला आहे आणि त्यावर तिचा नवरा फहादला टॅग केले. तिने त्या फोटोला “माझे हृदय आज ७ महिन्यांचे झाले आहे.” अशी कॅप्शन दिली आहे.

याआधी स्वराने आपल्या राबियासोबत पहिली ईद साजरी केली होती. तेव्हाही तिने राबिया आणि फहाद सोबतचा फोटो शेअर करून ईद सेलिब्रेशनची झलक दाखवली होती. फोटो शेअर करत स्वराने लिहिलं, “राबूची पहिली चांद रात! खूपच खास! सगळ्यांना ही चांद रात मुबारक.” परंतु उभयतांनी अजुनही आपल्या लेकीचा चेहरा दाखवलेला नाही.

Share this article