Close

तारक मेहतामधल्या भिडेची सोनू खऱ्या आयुष्यात चढणार बोहल्यावर, बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडिओ शेअर (Taarak Mehta ka Oolta Chashmaah Fame Jheel Mehta Shares Video With Boyfriend)

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेची सोनू लवकरच लग्न करणार आहे. पूर्वी सोनू भिडेची भूमिका साकारणाऱ्या झील मेहताने लग्नासाठी बॉयफ्रेंडला होकार दिला आहे.

झील मेहताने या प्रपोजलचा व्हिडिओ देखील शेअर केला. तू सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. व्हिडिओमध्ये तिचा बॉयफ्रेंड तिच्यासमोर नाचताना दिसत आहे. त्यानंतर शेवटी त्याने तिला लग्नाची मागणी घातली.

'कोई मिल गया मेरा दिल गया.' असे लिहित तिने व्हिडिओ शेअर करुन आपलं प्रेम व्यक्त केल. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचे काही मित्र तिल डोळ्यावर पट्टी बांधून आणतात आणि त्यानंतर तिचा प्रियकर आदित्य दुबे तिच्यासमोर डान्स करून तिला प्रपोज करतो. हे सर्व पाहताना झील खूपच भावूक झालेली पाहायला मिळते.

झीलच्या या व्हिडिओवर तिचा सहकलाकार म्हणजेच जुना टप्पू भव्य गांधीने हार्ट इमोशी शेअर करुन तिचे अभिनंदन केले आहे. दरम्यान मालिकेबदद्ल बोलायचे झाल्यास त्यात मध्यंतरीच्या काळात बरेच बदल झाले. अनेक वादविवाद होऊनही प्रेक्षकांमधील तिची लोकप्रियता कमी झालेली नाही.

Share this article